लोकाभिमुख प्रशासनासाठी शासनाचे सातत्यपूर्ण प्रयत्न -आकाश फुंडकर
अकोला, 01 ऑगस्ट (हिं.स.)।नागरिकांच्या अडीअडचणी वेळेत सोडविण्यासाठी प्रशासन अधिकाधिक गतिमान करण्याचा शासनाचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे. त्यादृष्टीने अनेक लोकाभिमुख उपक्रम व्यापक प्रमाणावर विविध विभागांच्या माध्यमातून राबविण्यात येत आहेत. महसूल विभागात
Photo


अकोला, 01 ऑगस्ट (हिं.स.)।नागरिकांच्या अडीअडचणी वेळेत सोडविण्यासाठी प्रशासन अधिकाधिक गतिमान करण्याचा शासनाचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे. त्यादृष्टीने अनेक लोकाभिमुख उपक्रम व्यापक प्रमाणावर विविध विभागांच्या माध्यमातून राबविण्यात येत आहेत. महसूल विभागातर्फे आयोजित महाराजस्व अभियान नागरिकांना आवश्यक सेवा गतीने व पारदर्शक पद्धतीने मिळण्यासाठी उपयुक्त ठरेल, असे प्रतिपादन राज्याचे कामगार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड आकाश फुंडकर यांनी आज येथे केले.

महसूल विभागातर्फे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचा शुभारंभ पालकमंत्री ॲड. फुंडकर यांच्या हस्ते नियोजनभवन येथे झाला. त्यावेळी ते बोलत होते. आमदार रणधीर सावरकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. खासदार अनुप धोत्रे, आमदार वसंत खंडेलवाल, महापौर शारदा खेडकर , उपमहापौर अमोल घोगे, मनपा स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आरती कुलवाल, उपविभागीय अधिकारी डॉ.शरद जावळे, मनोज लोणारकर, तहसीलदार कुणाल झाल्टे, सुनील चव्हाण, समाज कल्याण उपायुक्त मारूती वाठ यांच्यासह विविध यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री ॲड. फुंडकर म्हणाले की, समाजातील सर्व घटकांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी शासनाने अनेक महत्त्वपूर्ण योजनांना चालना दिली आहे. या योजनांचा लाभ गरजूंपर्यंत पोहोचून त्यांना मिळवून द्यावा. महाराजस्व अभियानासारख्या उपक्रमाचा त्यादृष्टीने प्रभावी वापर करावा.

शिबिराच्या माध्यमातून गरजूंना विविध योजना व सेवांचा लाभ मिळवून द्यावा, असे निर्देश खासदार धोत्रे यांनी दिले. शेतकरी बांधवांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. पात्र शेतकरी बांधवांना त्याचा लाभ मिळवून द्यावा. जिल्ह्यातील अधिकाधिक् शेतकऱ्यांनी पीक विमा योजनेत सहभागी होण्याचे आवाहन आमदार सावरकर यांनी केले.यावेळी विविध योजनेतील लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात लाभ वितरण, प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.

महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन कामाला वेग देण्यासाठी आणि नागरिकांची प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी तालुकास्तरावर महसूल विभागाकडून छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाचे आयोजन करण्यात आले. या अभियानातंर्गत प्रलंबित फेरफार, सातबारा उताऱ्यातील दुरुस्ती, जात आणि रहिवासी प्रमाणपत्र, तसेच घरपट्टे वाटप अशा विविध सुविधा एकाच छताखाली पुरवण्यात येत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / जयेश गावंडे


 rajesh pande