
लातूर, 01 ऑगस्ट (हिं.स.)। साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे केवळ साहित्य नसून कष्टकरी, श्रमिक, दलित आणि वंचित समाजाच्या वेदना, संघर्ष व स्वाभिमानाला शब्दबद्ध करणारा बुलंद आवाज आहे. त्यांच्या विचारांचा वारसा जपणे ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी आहे, असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री तथा आमदार संजय बनसोडे यांनी केले.
उदगीर येथील साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या सार्वजनिक जयंती महोत्सव समितीच्या वतीने ध्वजारोहण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी नगराध्यक्षा सौ.स्वाती हुडे, उपनगराध्यक्षा सौ.शितल शिंदे, बांधकाम सभापती ज्ञानेश्वर बिरादार, जि.प.चे माजी उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, जि.प.सदस्य डाॅ.दिपक सोमवंशी, गटनेते दिलीप मटके, तहसिलदार राम बोरगावकर, मुख्याधिकारी दिपक मोरे, बन्शिलाल कांबळे, शहराध्यक्ष सय्यद जानीमियाँ, प्रा.रामकिशन सोनकांबळे, नगरसेवक अनिल मुदाळे, मनोज पुदाले, अमोल अनकल्ले, बाळासाहेब मरलापल्ले, राजकुमार भालेराव, राजकुमार हुडगे, जवाहरलाल कांबळे, धिरज कसबे, अमर सुर्यवंशी, वर्षा कांबळे, शिवकुमार कांबळे, बाळासाहेब पाटोदे, अशोक पुदाले,
गणेश गायकवाड, राजकुमार लिंबाळे, विरेंद्र अंबरखाने, ओम गांजुरे, कल्याण कपाळे, मुकरम जहागिरदार, व्यंकट बोईनवाड, इमरोज हाशमी, इब्राहिम नाना, जफर सय्यद, राजकुमार चव्हाण, नवनाथ गायकवाड, अरविंद गिलचे, संघशक्ती बलांडे, मधुमती कनशेट्टे, उर्मिला वाघमारे, रविंद्र बेंद्रे, बालाजी रणदिवे, प्रेम जवळगेकर, देवीलाल कांबळे, महादेव शेल्हाळकर, राजु सुर्यवंशी, राम मोतीराम, नागेश गुंडीले, अंबादास कांबळे, गौतम किंवडे, आनंद बोडके, ऋषी लांडगे, दुर्गाप्रसाद गोटमुकले, अमोल सुर्यवंशी, राम कांबळे, सलिम शेख, आदी उपस्थित होते.
आ.संजय बनसोडे पुढे म्हणाले की, अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या लेखणीतून समाजातील अन्याय, विषमता आणि शोषणाविरोधात प्रभावी आवाज उठवला. त्यांनी लोकशाही, समता आणि सामाजिक न्यायाची मूल्ये आपल्या साहित्याद्वारे जनमानसात रुजवली. त्यांच्या कथा, कादंबऱ्या, पोवाडे आणि लोककलेतून सामान्य माणसाच्या जीवनसंघर्षाला स्वतंत्र्य मिळाले. त्यामुळे त्यांचे साहित्य आजही तितकेच प्रेरणादायी आणि मार्गदर्शक आहे.
अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा गौरव सरकारने 'भारतरत्न' हा सर्वोच्च किताब देवुन करावा अशी मागणी मी मागील काळात सरकारकडे केली असुन त्यासाठी माझा पाठपुरावा चालु असल्याचे आ.संजय बनसोडे यांनी सांगितले.
आपल्या पुढच्या पिढीला प्रेरणा मिळावी म्हणून उदगीर शहरात अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने १५ कोटीचे भव्य स्मारक आणि अण्णाभाऊ साठे यांचा १५ फुटी पुर्णाकृती पुतळा उभारण्यासाठी १ कोटी २५ लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. येत्या एक वर्षात सदर काम पुर्ण होईल असे सांगितले.
समाजातील उपेक्षित घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी अण्णाभाऊ साठे यांनी आयुष्यभर संघर्ष केला. त्यांचे विचार नव्या पिढीपर्यंत पोहोचविणे आणि त्यांच्या साहित्याचा अभ्यास करणे ही काळाची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले.
यावेळी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुर्णाकृती प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक बन्सिलाल कांबळे यांनी केले. सुत्रसंचालन किरण सुर्यवंशी यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रथमेश देवनाळे यांनी आभार व्यक्त केले.
यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते, साहित्यप्रेमी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis