भारतीय कपास निगम लिमिटेडच्या ५६ व्या स्थापना दिन सोहळ्यासकेंद्रीय मंत्री श्री. गिरिराज सिंह उपस्थिती
छत्रपती संभाजीनगर, 01 ऑगस्ट (हिं.स.)। भारतीय कपास निगम लिमिटेड (CCI), वस्त्र मंत्रालय, भारत सरकार यांच्या ५६ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित भव्य कार्यक्रमास उपस्थित राहून विविध उपक्रमांचा लाभ घेतला. या कार्यक्रमास केंद्रीय वस्त्र मंत्री श्री. गिर
अ


छत्रपती संभाजीनगर, 01 ऑगस्ट (हिं.स.)।

भारतीय कपास निगम लिमिटेड (CCI), वस्त्र मंत्रालय, भारत सरकार यांच्या ५६ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित भव्य कार्यक्रमास उपस्थित राहून विविध उपक्रमांचा लाभ घेतला. या कार्यक्रमास केंद्रीय वस्त्र मंत्री श्री. गिरिराज सिंह हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. त्यांच्या प्रेरणादायी मार्गदर्शनातून देशातील कापूस उत्पादक शेतकरी, वस्त्रोद्योग आणि आत्मनिर्भर भारताच्या दिशेने होत असलेल्या वाटचालीबाबत मौल्यवान विचार मांडण्यात आले.

यावेळी वस्त्रोद्योग क्षेत्रातील विविध घडामोडी, शेतकरी हिताच्या योजना, तंत्रज्ञानाचा वाढता वापर आणि कापूस क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती घेण्याची संधी मिळाली. संबंधित मान्यवर, अधिकारी आणि उपस्थितांशी संवाद साधत या क्षेत्राच्या प्रगतीसाठी होत असलेल्या प्रयत्नांचे कौतुक करण्यात आले.

भारतीय कपास निगम लिमिटेडच्या ५६ व्या स्थापना दिनानिमित्त संस्थेच्या यशस्वी वाटचालीस मनःपूर्वक शुभेच्छा! देशातील शेतकरी आणि वस्त्रोद्योगाच्या विकासासाठी संस्थेचे कार्य अधिकाधिक प्रभावीपणे पुढे सुरू राहो, असे त्यांनी सांगितले

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande