पुण्यातील बी. जे. मेडिकलचा विद्यार्थी १४ दिवसांपासून बेपत्ता; रॅगिंगचा आरोप
पुणे, 01 ऑगस्ट (हिं.स.)। बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या प्रथम वर्षात शिक्षण घेणारा तन्मय वंगे हा विद्यार्थी गेल्या १४ दिवसांपासून बेपत्ता असल्याने खळबळ उडाली आहे. तन्मयला महाविद्यालयात प्रवेश घेतल्यापासून काही वरिष्ठ विद्यार्थ्यांकडून
बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय


पुणे, 01 ऑगस्ट (हिं.स.)। बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या प्रथम वर्षात शिक्षण घेणारा तन्मय वंगे हा विद्यार्थी गेल्या १४ दिवसांपासून बेपत्ता असल्याने खळबळ उडाली आहे. तन्मयला महाविद्यालयात प्रवेश घेतल्यापासून काही वरिष्ठ विद्यार्थ्यांकडून सातत्याने मानसिक छळ सहन करावा लागत होता. या त्रासाला कंटाळूनच त्याने वसतिगृह सोडल्याचा आरोप त्याचे वडील अजयकुमार वंगे यांनी केला आहे.

अजयकुमार वंगे यांच्या म्हणण्यानुसार, १८ जुलै रोजी तन्मय नातेवाइकांकडे जात असल्याचे सांगून हॉस्टेलमधून बाहेर पडला. त्यानंतर तो परतलाच नसून, गेल्या १४ दिवसांपासून त्याचा कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही. या प्रकरणी त्यांनी पोलिस आणि महाविद्यालय प्रशासनाकडे तक्रार दाखल केली आहे. दरम्यान, बी. जे. वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने रॅगिंगच्या आरोपांचे खंडन केले आहे. महाविद्यालयाने नेमलेल्या चौकशी समितीने या प्रकरणाचा तपास केला असून, रॅगिंग झाल्याचा कोणताही पुरावा आढळलेला नाही तसेच कोणताही विद्यार्थी दोषी आढळून आलेला नाही, असा खुलासा प्रशासनाने केला आहे. सध्या तन्मय वंगे याचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून तपास सुरू असून, बेपत्ता विद्यार्थ्याचा शोध घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande