पार्किंगच्या वादातून सराफा बाजारात धिंगाणा
छत्रपती संभाजीनगर, 01 ऑगस्ट (हिं.स.)। छत्रपती संभाजी नगर शहरात पार्किंगच्या वादातून सराफा बाजारात धिंगाणा झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. छत्रपती संभाजीनगरातील सराफा बाजार परिसरात पार्किंगच्या किरकोळ वादाचे हाणामारीत रूपांतर झाले. मोहन टॉ
पार्किंगच्या वादातून सराफा बाजारात धिंगाणा


छत्रपती संभाजीनगर, 01 ऑगस्ट (हिं.स.)।

छत्रपती संभाजी नगर शहरात

पार्किंगच्या वादातून सराफा बाजारात धिंगाणा झाल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे.

छत्रपती संभाजीनगरातील सराफा बाजार परिसरात पार्किंगच्या किरकोळ वादाचे हाणामारीत रूपांतर झाले. मोहन टॉकीजसमोरील इलेक्ट्रिकल्स दुकानात दोन गट आमनेसामने येत तुंबळ मारामारी केली. एका कॉलनंतर मोठे टोळके घटनास्थळी पोहोचल्याने परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला. माहिती मिळताच सिटी चौक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. कोणत्याही पक्षाने तक्रार दिली नसल्याने सिटी चौक पोलिसांनी स्वतः फिर्यादी होत दोन्ही गटांतील सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या संदर्भात अधिक तपास करीत आहेत.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande