चंद्रपूर : पावसाचा वेग मंदावला मात्र जिल्ह्यात पूर परिस्थिती
चंद्रपूर, 01 ऑगस्ट (हिं.स.)।जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती गंभीर बनली असून अनेक ठिकाणी नागरिकांचे स्थलांतर, रस्ते बंद आणि नदीपात्रातील पाणीपातळीत वाढ झाल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. दरम्यान शनिवारी पावसाने पावसाची गती मंदावल्याने व पावसाने
चंद्रपूर : पावसाचा वेग मंदावला मात्र जिल्ह्यात पूर परिस्थिती


चंद्रपूर, 01 ऑगस्ट (हिं.स.)।जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती गंभीर बनली असून अनेक ठिकाणी नागरिकांचे स्थलांतर, रस्ते बंद आणि नदीपात्रातील पाणीपातळीत वाढ झाल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. दरम्यान शनिवारी पावसाने पावसाची गती मंदावल्याने व पावसाने काही ठिकाणी विश्रांती घेतल्याने मात्र दिलासा मिळाला आहे.

आरवटच्या सहारा पार्कमध्ये ईरई नदीचे पाणी शिरले. वर्धा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने चंद्रपूर शहराला वळसा घालणाऱ्या ईरई नदीने पात्र सोडले आहे. त्यामुळे रहमतनगर, सहारा पार्क आणि भिवापूर परिसरात पुराचे पाणी शिरायला सुरुवात झाली. रहमत नगर परिसरातील इरई नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सुमारे ३० नागरिकांचे सुरक्षित महात्मा ज्योतिबा फुले शाळेत स्थानांतरण करण्यात आले आहे.रहमत नगर येथून नागरिकांना चंद्रपूर महानगरपालिकेच्या महात्मा ज्योतिबा फुले शाळेपर्यंत सुरक्षितरित्या आणण्यासाठी महानगरपालिकेमार्फत आवश्यक वाहनांची व्यवस्था करण्यात आली. त्यानंतर सर्व नागरिकांना शाळेमध्ये तात्पुरता निवारा उपलब्ध करून देण्यात आला.तसेच,स्थानांतरित नागरिकांच्या राहण्याची, भोजनाची, पिण्याच्या पाण्याची तसेच इतर आवश्यक मूलभूत सुविधांची व्यवस्था चंद्रपूर महानगरपालिकेमार्फत करण्यात आली. चंद्रपूर महानगरपालिका प्रशासन परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून असल्याची माहिती मनपा सूत्रांनी दिली.

चंद्रपूर येथील आरवट गावातील सहारा पार्क येथील निवासी भागातील घरामध्ये पाणी घुसले. या ठिकाणी ४० कुटुंब राहत असून सर्वांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. वर्धा नदीची वाढती पाणी पातळी लक्षात घेता राजुरा - बामणी (बल्लारपूर) रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला.

पर्यायी मार्ग राजुरा सास्ती मार्गे बल्लारपूर रस्ता वाहतुकीसाठी सुरू आहे. जोगापूर फाटा वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली. सकाळी पर्यंत येथील अवजड वाहने व माल वाहतूक थांबवून ठेवली होती . त्यांना बायपासवर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली. पण वर्धा नदी पुलावर पाणी नसून वाहतूक सुरळीत सुरू आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / एम.पंकजराव


 rajesh pande