रत्नागिरी : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना जिल्हाधिकाऱ्यांकडून अभिवादन
रत्नागिरी, 1 ऑगस्ट (हिं.स.) । लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना पुण्यतिथीनिमित्त जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी येथील लोकमान्य टिळक जन्मस्थळी त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तेथील ध्वजस्तंभावर जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते त
लोकमान्य टिळकांना अभिवादन


रत्नागिरी, 1 ऑगस्ट (हिं.स.) । लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना पुण्यतिथीनिमित्त जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी येथील लोकमान्य टिळक जन्मस्थळी त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. तेथील ध्वजस्तंभावर जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते तिरंग्याचे ध्वजारोहणही करण्यात आले.

'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे', असे ब्रिटिशांना ठणकावून सांगताना लोकमान्य टिळक यांनी स्वातंत्र्यसंग्रामात चैतन्य निर्माण केले. आज त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त येथील लोकमान्य टिळक जन्मस्थळावर असणाऱ्या त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जिल्हाधिकारी श्री जिंदल यांनी अभिवादन केले. ध्वजारोहणानंतर उपस्थितांनी राष्ट्रगीत म्हटले. लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेसमोर दीपप्रज्वलन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच अर्धपुतळ्यासदेखील पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. त्यानंतर लोकमान्यांच्या जीवनचरित्रावर आधारित छायाचित्र प्रदर्शन आणि वस्तूंची पाहणी जिल्हाधिकाऱ्यांनी केली.

प्रांताधिकारी जीवन देसाई, तहसीलदार राजाराम म्हात्रे, पुरातत्त्व विभागाचे अधिकारी-कर्मचारी यांनीही यावेळी अभिवादन केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande