यवतमाळ : चिखलीतील शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान, संयुक्त पंचनामासह नुकसानभरपाई देण्याची मागणी
यवतमाळ , 01 ऑगस्ट (हिं.स.)चिखली गाव परिसरात पाण्याच्या तीव्र प्रवाहामुळे सुमारे दहा ते १२ शेतकर्!यांच्या शेतीसह उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या प्रकरणाची तातडीने संयुक्त पाहणी करून पंचनामा करण्यात यावा तसेच नुकसानग्रस्त शेतकर्!यां
चिखलीतील शेतकर्!यांच्या पिकांचे नुकसान


यवतमाळ , 01 ऑगस्ट (हिं.स.)चिखली गाव परिसरात पाण्याच्या तीव्र प्रवाहामुळे सुमारे दहा ते १२ शेतकर्!यांच्या शेतीसह उभ्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या प्रकरणाची तातडीने संयुक्त पाहणी करून पंचनामा करण्यात यावा तसेच नुकसानग्रस्त शेतकर्!यांना नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी ठाकरे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख तथा माजी पंचायत समिती सदस्य संजय निखाडे यांनी उपविभागीय अधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

पाण्याचा प्रवाह हा वेकोलीच्या कामकाजामुळे किंवा पाण्याच्या निचर्!याची योग्य व्यवस्था नसल्यामुळे निर्माण झाला असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. त्यामुळे महसूल विभाग, कृषी विभाग आणि वेकोलीच्या अधिकार्!यांचे संयुक्त पथक घटनास्थळी पाठवून प्रत्येक बाधित शेताची पाहणी करून पंचनामा करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक शेतकर्!याच्या नुकसानीची स्वतंत्र नोंद करून शासनाच्या नियमानुसार तातडीने नुकसानभरपाई देण्यात यावी, चौकशीत वेकोली जबाबदार आढळल्यास संबंधित कंपनीकडून नुकसानभरपाई वसूल करावी आणि दोषी अधिकार्!यांवर नियमानुसार कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. भविष्यात अशा प्रकारच्या घटना टाळण्यासाठी पाण्याचा योग्य निचरा होईल, अशा आवश्यक उपाययोजना तातडीने करण्यात याव्यात, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, मागण्यांवर तातडीने कार्यवाही न झाल्यास नुकसानग्रस्त शेतकर्!यांना सोबत घेऊन वेकोली प्रशासनाविरोधात आंदोलन करण्याचा इशाराही संजय निखाडे यांनी दिला आहे.

--------------------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande