
छत्रपती संभाजीनगर, 01 ऑगस्ट (हिं.स.)।
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील चार कर्मचा-यांना निरोप समारंभ कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला.
महात्मा फुले सभागृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी प्रकुलगुरु डॉ.प्रवीण वक्ते, कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमास सेवा निवृत्ती निमित्त कृष्णा एस.दाभाडे (उपकुलसचिव,विशेष कक्ष), ए.टी.चव्हाण (प्रयोगशाळा परिचर, पदार्थ विज्ञान विभाग), के.एस.दाभाडे (प्रयोगशाळा परिचर, दिनदयाल उपाध्याय कौशल्य केंद्र), डी.एस.धनेधर (प्रयोगशाळा तंत्रज्ञ, रसायन तंत्रज्ञान विभाग) यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. त्यांना मानपत्र देऊन गौरव करण्यात आला. यावेळी रेखा दाभाडे, शोभा धनेधर, रंजना दाभाडे यांचाही सत्कार करण्यात आला. या कर्मचा-यांनी सेवानिवृत्ती नंतरचा कार्यकाळ कुटूंबियांसाठी दिला पाहिजे, असे कुलगुरु डॉ.विजय फुलारी म्हणाले. तर विद्यापीठाने जीवनात परिवर्तन घडविले, असे कृष्णा दाभाडे म्हणाले.
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis