
यवतमाळ 01 ऑगस्ट (हिं.स.)केवळ शेतीचे उत्पादन वाढविणे हेच ध्येय न ठेवता उत्पादित शेतीमालाची गुणवत्ता आणि मूल्यवृद्धी करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हा कृषी अधीक्षक मनोजकुमार ढगे यांनी केले आहे. याच उद्देशाने शेतकर्!यांसाठी परदेश अभ्यास दौर्!याची योजना राबविण्यात येत असून, पात्र शेतकर्!यांना शासनाकडून मोठे आर्थिक सहाय्य दिले जाणार आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना परदेशातील आधुनिक शेती, पीक व्यवस्थापन, प्रक्रिया उद्योग, निर्यातक्षम शेती, जलव्यवस्थापन आणि अत्याधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अभ्यास करण्याची संधी मिळणार आहे. अभ्यास दौऱ्यासाठी शासनाकडून एकूण खर्चाच्या ५० टक्के रक्कम किंवा कमाल दोन लाख रुपये, यापैकी जी रक्कम कमी असेल ती अनुदान म्हणून देण्यात येणार आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदाराकडे फार्मर आयडी असणे बंधनकारक आहे. तसेच अर्जदाराचे मुख्य उत्पन्नाचे साधन शेती असणे आवश्यक आहे. सर्व पात्र घटकांतील शेतकरी या योजनेसाठी अर्ज करू शकतात. इच्छुक शेतकऱ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह प्रस्ताव कृषी विभागाकडे सादर करावेत, असे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक मनोजकुमार ढगे यांनी केले आहे. या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जागतिक स्तरावरील कृषी तंत्रज्ञानाची माहिती मिळून शेती अधिक गुणवत्तापूर्ण, स्पर्धात्मक आणि लाभदायक होण्यास मदत होईल, असा विश्वास कृषी विभागाने व्यक्त केला आहे.
हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी