सिरसाळा येथे वसंतराव नाईक यांची जयंती उत्साहात; पंकजा मुंडे, धनंजय मुंडेंची प्रमुख उपस्थिती
बीड, 01 ऑगस्ट (हिं.स.)। हरित क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतरावजी नाईक साहेब यांची सार्वजनिक जयंती आज परळी तालुक्यातील शिरसाळा येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आ
वसंतराव नाईक जयंती


बीड, 01 ऑगस्ट (हिं.स.)। हरित क्रांतीचे प्रणेते आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतरावजी नाईक साहेब यांची सार्वजनिक जयंती आज परळी तालुक्यातील शिरसाळा येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आणि राज्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला पंकजा मुंडे यांनी श्री संत सेवालाल महाराज आणि पूज्य संत रामराव महाराज यांच्या चरणी नतमस्तक होऊन दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी कै. वसंतरावजी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून त्यांच्या पावन स्मृतीस विनम्र अभिवादन केले. यावेळी त्यांनी उपस्थित जनसमुदायाशी संवाद साधत वसंतराव नाईक यांच्या कार्याचा गौरव केला.

या जयंती सोहळ्याला धर्मगुरु आ. बाबुसिंग महाराज, आ .धनंजय मुंडे,मोहिनीताई इंद्रनिल नाईक, नसीब शेख, अजय मुंडे, डी. एस. राठोड, विलास राठोड, पप्पू चव्हाण, वसंत राठोड, सुशांत पवार, बंडू राठोड, दिलीप राठोड आणि शूरु गरोडा यांच्यासह सर्व संयोजक मंडळ, पदाधिकारी व बंजारा समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा सोहळा यशस्वी करण्यासाठी स्थानिक संयोजन समितीने विशेष परिश्रम घेतले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande