
लातूर, 01 ऑगस्ट (हिं.स.)।
जळकोट तालुक्यातील धामणगाव येभील धनलक्ष्मी महिला शेतकरी गटाने सोयाबीन पिकावरील किडीचे प्रभायो व्यवस्थापन करण्यासाठी एकत्रित गटशेतीच्या माध्यमातून विविध उपाययोजना हाती घेतल्या आहेत. यामध्ये प्रति एकर २० पक्षी थांबे, १५ पिवळे चिकट सापळे, ५ निळे चिकट सापळे तसेच कृषी विभागाकडून मोफत उपलब्ध करून देण्यात आलेले ४ कामगंध (फेरोमोन) सापळे लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
या सापळ्यांची योग्य पद्धतीने उभारणी करताना महिलांना अडचणी येत असल्याची माहिती मिळताच कृषी विभागाचे कृषी सहाय्यक आणि पाणी फाउंडेशनचे प्रदीप रेखीवाड यांनी भर पावसात शेतकयांच्या बांधावर घाव घेत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे मार्गदर्शन केले. त्यांनी चिकट सापळे, कामगंध सापळे
योग्य पद्धतीने कसे उभारावेत, तसेच त्यांचा कीड नियंत्रणासाठी कसा प्रभावी वापर करावा याबाबत माहिती दिली. यावेळी गटाच्या निमंत्रक सौ. सीमा आगलावे, सीमा आगलावे, पार्वती आगलावे, सरस्वती आगलावे उपस्थित होत्या, महिला शेतकरी गटाच्या या सामूहिक उपक्रमामुळे सोयाचीन पिकावरील कीड नियंत्रण अधिक प्रभावी होऊन उत्पादन वाढीस मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis