
परभणी, 01 ऑगस्ट (हिं.स.) : परभणी येथील ज्ञानोपासक महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) आणि हिंदी विभागाच्या संयुक्त विद्यमाने लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १०६ वी जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शेख मोहम्मद बाबर आणि प्रा. डॉ. सुजितसिंह परिवार यांच्या हस्ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी त्यांच्या सामाजिक, साहित्यिक आणि लोकशाहीर म्हणून केलेल्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यात आला.या प्रसंगी प्रा. डॉ. जी. एस. पिसे, प्रा. डॉ. जी. एस. मारेवाड, प्रा. डॉ. एन. ई. लोंढे, प्रा. संतोष सोळंके, प्रा. आनंद लोखंडे, प्रा. वाल्मीक भोसले यांच्यासह महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या साहित्यिक योगदानाचा, सामाजिक समतेच्या विचारांचा तसेच श्रमिकांच्या जीवनाला आवाज देणाऱ्या त्यांच्या कार्याचा गौरव केला. त्यांच्या विचारांचे अनुकरण करून समाजहितासाठी कार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.कार्यक्रम उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.
------------------------
हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis