
लातूर, 01 ऑगस्ट (हिं.स.)। लातूर शहरातील हत्ते नगर येथील श्री सिद्धिविनायक गणेश मंदिरात आमदार बसवराज पाटील मुरूमकर यांनी भेट देऊन श्री गणरायाचे मनोभावे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी पूजा-अर्चा करत राज्यातील सुख, समृद्धी, शांती आणि सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी प्रार्थना केली.
दर्शनानंतर संजय हत्ते यांनी आमदार बसवराज पाटील मुरूमकर यांचा श्री गणरायाची सुंदर मूर्ती भेट देऊन सत्कार केला. यावेळी उपस्थितांनी गणरायाच्या जयघोषात धार्मिक आणि भक्तिमय वातावरणाचा अनुभव घेतला.
या प्रसंगी शिरीषप्पा उटगे, दिलीप भालेराव, संगमेश्वर ठेसे, बसवराज धाराशिवे आणि मधुसूदन पारीख यांची उपस्थिती होती. मंदिर परिसरात भाविकांची मोठी उपस्थिती असून भक्तिमय वातावरणात दर्शनाचा कार्यक्रम पार पडला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis