अमरावती विद्यापीठाच्या संशोधनाला नवे यश; 'प्लँट रेफरन्स स्टँडर्ड्स'चे लोकार्पण
अमरावती, 01 ऑगस्ट (हिं.स.)। संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या बायोटेक्नॉलॉजी विभागाने संशोधन क्षेत्रात मोठे यश संपादन केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगातर्फे मंजूर आणि आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूट, पुणे यांच्या
संशोधन क्षेत्रात विद्यापीठाच्या बायोटेक्नॉलॉजी विभागाचे मोठे यश


अमरावती, 01 ऑगस्ट (हिं.स.)। संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या बायोटेक्नॉलॉजी विभागाने संशोधन क्षेत्रात मोठे यश संपादन केले आहे. महाराष्ट्र शासनाच्या राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगातर्फे मंजूर आणि आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूट, पुणे यांच्या समन्वयाने राबविण्यात येत असलेल्या ७.३ कोटी रुपयांच्या भव्य संशोधन प्रकल्पांतर्गत 'प्लँट रेफरन्स स्टँडर्ड्स' (औषधी वनस्पतींमधील प्रमाणित मेटाबोलाइट्स) विकसित करण्यात आले आहेत. या नवनर्मित वनस्पती संदर्भ मानकांचे कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांच्या हस्ते लोकार्पण झाले. याप्रसंगी प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे, कुलसचिव डॉ. अविनाश असनारे, डॉ. प्रशांत ठाकरे यांच्यासह सर्व पीएच.डी. संशोधक विद्यार्थी उपस्थित होते.

यावेळी कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते यांनी संशोधन पथकाच्या या उत्कृष्ट यशाबद्दल त्यांचे अभिनंदन करुन आगामी काळात बायोटेक्नॉलॉजी विभागाकडून अशाच प्रकारच्या उच्च दर्जाच्या संशोधन उपक्रमांची परंपरा कायम राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बायोटेक्नॉलॉजी विभागप्रमुख डॉ. अनिता पाटील यांच्या नेतृत्वात संशोधन पथकातील डॉ. हरिप्रसाद पैकराओ, डॉ. एस. आर. पाटील, डॉ. अंकित काळे तसेच प्रकल्प सहकारी कु. ज्ञानेश्वरी चोखट आणि कु. पल्लवी मरकाम यांनी अत्यंत कमी खर्चाच्या तंत्रज्ञानाचा वापर करून विविध औषधी वनस्पतींमधून महत्त्वाची मानके यशस्वीपणे वेगळी केली आहेत.

या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे वनस्पती मानकांचे विलगीकरण व निष्कर्षण करण्यात आले आहे. पुनर्नवा, बोएराव्हिनोन बी आणि युपॅलिटिन गोखुरू, हार्मिन, प्रोटोडिओस्सिन, अश्वगंधा, विथेफेरिन ए विकसित केलेले हे तंत्रज्ञान राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोग आणि आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूट, पुणे यांच्यासोबत सामंजस्य करार करून उद्योग क्षेत्राला हस्तांतरित केले जाऊ शकते, ज्यामुळे व्यावसायिक आणि औषध निर्माण क्षेत्रास याचा मोठा फायदा होईल, असा विश्वास याप्रसंगी मान्यवरांनी व्यक्त केला.

----------------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande