माटुंगा-मुलुंड अप-डाऊन जलद मार्गावर मेगा ब्लाॅक
मुंबई, 01 ऑगस्ट (हिं.स.) - मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाद्वारे दिनांक ०२.०८.२०२६ रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेन लाईनवर माटुंगा ते मुलुंड दरम्यान आणि हार्बर लाईनवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रे स्थानकां
माटुंगा-मुलुंड अप-डाऊन जलद मार्गावर मेगा ब्लाॅक


मुंबई, 01 ऑगस्ट (हिं.स.) - मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाद्वारे दिनांक ०२.०८.२०२६ रोजी विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी मेन लाईनवर माटुंगा ते मुलुंड दरम्यान आणि हार्बर लाईनवर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते चुनाभट्टी/वांद्रे स्थानकांदरम्यान मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे.

यामुळे प्रभावित होणाऱ्या सेवा खालीलप्रमाणे असतील:-

मेन लाईन:

ब्लॉकचा कालावधी: माटुंगा - मुलुंड स्थानकांदरम्यान 'अप' आणि 'डाऊन' जलद मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.४५ वाजेपर्यंत

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी १०.३६ ते दुपारी ३.१० या वेळेत सुटणाऱ्या 'डाऊन' जलद मार्गावरील गाड्या माटुंगा येथून 'डाऊन' धिम्या मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यानच्या निर्धारित स्थानकांवर थांबतील आणि आपल्या गंतव्यस्थानी १५ मिनिटे उशिरा पोहोचतील. ठाणे येथून पुढे जाणाऱ्या जलद गाड्या मुलुंड येथून पुन्हा 'डाऊन' जलद मार्गावर वळवल्या जातील.

ठाणे येथून सकाळी ११.०३ ते दुपारी ३.३८ या वेळेत सुटणाऱ्या 'अप' जलद मार्गावरील गाड्या मुलुंड स्थानकावर 'अप' धिम्या मार्गावर वळवल्या जातील. या गाड्या मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यानच्या निर्धारित स्थानकांवर थांबतील, माटुंगा येथून पुन्हा 'अप' जलद मार्गावर वळवल्या जातील आणि आपल्या गंतव्यस्थानी १५ मिनिटे उशिरा पोहोचतील.

हार्बर लाईन:

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – चुनाभट्टी / वांद्रे 'डाऊन' हार्बर लाईन: सकाळी ११.४० ते सायंकाळी ४.४० वाजेपर्यंत आणि चुनाभट्टी / वांद्रे – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस 'अप' हार्बर लाईन: सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० वाजेपर्यंत

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ११.१६ ते सायंकाळी ४.४७ या वेळेत सुटणाऱ्या वाशी/बेलापूर/पनवेल येथे जाणाऱ्या 'डाऊन' हार्बर लाईनवरील गाड्या आणि सकाळी १०.४८ ते सायंकाळी ४.४३ या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱ्या वांद्रे/गोरेगाव येथे जाणाऱ्या 'डाऊन' हार्बर लाईनवरील गाड्या रद्द राहतील.

पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जाणाऱ्या गाड्या आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे जाणाऱ्या 'अप' हार्बर लाईनवरील सेवा बंद राहतील.

ब्लॉकच्या कालावधीत पनवेल आणि कुर्ला (फलाट क्रमांक ८) दरम्यान २० मिनिटांच्या अंतराने विशेष सेवा चालवल्या जातील.

ब्लॉकच्या कालावधीत हार्बर लाईनवरील प्रवाशांना सकाळी १०.०० ते सायंकाळी ६.०० या वेळेत मेन लाईन आणि पश्चिम लाईन वरून प्रवास करण्याची मुभा असेल.

---------------

हिंदुस्थान समाचार / सुधांशू जोशी


 rajesh pande