पुणे जिल्ह्यात शालेय पोषण आहाराचा तांदूळ संपला; लाखो विद्यार्थ्यांवर परिणाम
पुणे, 01 ऑगस्ट (हिं.स.)। पुणे जिल्ह्यात शालेय पोषण आहारासाठी आवश्यक असलेल्या तांदळाचा पुरवठा वेळेत न झाल्याने अनेक शाळांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. जिल्हा परिषदेच्या सुमारे ३ हजार ५०० शाळांमधील २ लाख ४० हजार विद्यार्थ्यांसह जिल्ह्यातील विविध शैक
पुणे जिल्ह्यात शालेय पोषण आहाराचा तांदूळ संपला; लाखो विद्यार्थ्यांवर परिणाम


पुणे, 01 ऑगस्ट (हिं.स.)। पुणे जिल्ह्यात शालेय पोषण आहारासाठी आवश्यक असलेल्या तांदळाचा पुरवठा वेळेत न झाल्याने अनेक शाळांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. जिल्हा परिषदेच्या सुमारे ३ हजार ५०० शाळांमधील २ लाख ४० हजार विद्यार्थ्यांसह जिल्ह्यातील विविध शैक्षणिक संस्थांमधील मिळून जवळपास ७ लाख ४० हजार विद्यार्थी शालेय पोषण आहाराचा लाभ घेतात. अनेक शाळांमधील शिल्लक तांदूळ संपला असून, काही ठिकाणी उसनवारीने आणलेला तांदूळही संपल्यामुळे विद्यार्थ्यांना नियमित पोषण आहार देणे कठीण झाले आहे. त्यामुळे शिक्षक आणि शाळा प्रशासन अडचणीत सापडले आहेत.

नियमितपणे दर दोन महिन्यांनी पोषण आहाराचा पुरवठा होणे अपेक्षित असताना यंदा पुरवठा रखडला आहे. वर्षभरात सुमारे पाच वेळा धान्याचा पुरवठा केला जातो. मात्र, यंदा संबंधित विभागाकडून करारनामा अद्याप पूर्ण न झाल्याने पुरवठा आदेशही जारी होऊ शकलेला नाही. १५ जूनपर्यंत तांदळाचा पुरवठा होणे अपेक्षित असताना हा प्रश्न गेल्या दीड महिन्यांपासून प्रलंबित आहे. त्यामुळे शालेय पोषण आहार योजना सुरळीत सुरू ठेवण्यासाठी तातडीने धान्याचा पुरवठा करण्याची मागणी शाळांकडून करण्यात येत आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / भूषण राजगुरु


 rajesh pande