परभणी महापालिकेचा ‘स्वागत स्त्री जन्माचे’ उपक्रम उत्साहात
परभणी, 01 ऑगस्ट (हिं.स.) : मुलींच्या जन्माचे स्वागत करून समाजात स्त्री जन्माविषयी सकारात्मक दृष्टीकोन निर्माण करण्याच्या उद्देशाने परभणी महानगरपालिकेच्या वतीने यूपीएससी खानापूर येथे ‘स्वागत स्त्री जन्माचे’ या उपक्रमाचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले
परभणी महापालिकेचा ‘स्वागत स्त्री जन्माचे’ उपक्रम उत्साहात


परभणी, 01 ऑगस्ट (हिं.स.) : मुलींच्या जन्माचे स्वागत करून समाजात स्त्री जन्माविषयी सकारात्मक दृष्टीकोन निर्माण करण्याच्या उद्देशाने परभणी महानगरपालिकेच्या वतीने यूपीएससी खानापूर येथे ‘स्वागत स्त्री जन्माचे’ या उपक्रमाचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले.या कार्यक्रमात नवजात बालिकांच्या कुटुंबांचा सन्मान करण्यात आला तसेच त्यांना बेबी किटचे वितरण करण्यात आले. मुलींच्या जन्माचा आनंद साजरा करत समाजात महिला सक्षमीकरणाचा संदेश देण्यात आला.

कार्यक्रमाला परभणी महानगरपालिकेचे महापौर सय्यद इकबाल, उपमहापौर गणेश देशमुख, आयुक्त नितीन नार्वेकर, आरोग्य सभापती डॉ. अबोली कांबळे, आरोग्य सभापती प्रतिनिधी डॉ. अनिल कांबळे, स्थानिक नगरसेविका सौ. सुशीला जिजा थोरात, डॉ. खातिंग, विजय भालेराव तसेच सांगळे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी मान्यवरांनी मुलगी ही कुटुंब, समाज आणि राष्ट्राची अमूल्य संपत्ती असल्याचे सांगितले. मुलीच्या जन्माचे आनंदाने स्वागत करणे ही प्रत्येकाची सामाजिक जबाबदारी असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच स्त्री भ्रूणहत्या रोखणे, मुलींचे शिक्षण, आरोग्य, पोषण आणि महिला सक्षमीकरणासाठी समाजाने सकारात्मक भूमिका घेण्याचे आवाहन करण्यात आले.

महापौर सय्यद इकबाल, उपमहापौर गणेश देशमुख आणि आरोग्य सभापती डॉ. अबोली कांबळे यांच्या हस्ते नवजात बालिकांच्या कुटुंबांना बेबी किटचे वितरण करण्यात आले. या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी आरोग्य विभाग प्रमुख डॉ. कल्पना सावंत, सहाय्यक आयुक्त तथा शहर कार्यक्रम व्यवस्थापक गजानन जाधव, वैद्यकीय अधिकारी डॉ. आदिती जोंधळे तसेच यूपीएससी खानापूर येथील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

‘स्वागत स्त्री जन्माचे’ या उपक्रमातून मुलींच्या जन्माचा गौरव, महिला सक्षमीकरण आणि समाजात स्त्री जन्माविषयी सकारात्मक विचार रुजविण्याचा प्रभावी संदेश देण्यात आला.

----------------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande