मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमात रत्नागिरी जिल्ह्याची राज्यात बाजी
रत्नागिरी, 1 ऑगस्ट (हिं.स.) । भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमात रत्नागिरी जिल्ह्याने संपूर्ण महाराष्ट्रात चमकदार कामगिरी केली आहे. या कार्यक्रमांतर्गत पहिल्या टप्प्यातील गृहभेटींचे १
मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमात रत्नागिरी जिल्ह्याची राज्यात बाजी


रत्नागिरी, 1 ऑगस्ट (हिं.स.) । भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमात रत्नागिरी जिल्ह्याने संपूर्ण महाराष्ट्रात चमकदार कामगिरी केली आहे.

या कार्यक्रमांतर्गत पहिल्या टप्प्यातील गृहभेटींचे १०० टक्के काम पूर्ण करण्यात जिल्ह्यातील चिपळूण, दापोली आणि गुहागर हे तीन विधानसभा मतदारसंघ राज्यात अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय ठरले आहेत.

जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी मनुज जिंदल यांनी या उल्लेखनीय कामगिरीबद्दल संपूर्ण निवडणूक यंत्रणेचे कौतुक केले आहे.

भारत निवडणूक आयोगाच्या १४ मे २०२६ च्या पत्रान्वये महाराष्ट्र राज्यासाठी मतदार यादीचा विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यानुसार ३० जून २०२६ पासून मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याद्वारे मतदारांच्या घरोघरी भेट देऊन गणना प्रपत्र (Enumeration Form) वाटप व संकलनाचे काम रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुरू करण्यात आले होते.

या महत्त्वपूर्ण मोहिमेच्या पहिल्या टप्प्यातील गृहभेटी कार्यक्रमातील कार्यवाही १०० टक्के पूर्ण करणारे महाराष्ट्रातील पहिले तीन मतदारसंघ रत्नागिरी जिल्ह्यातील ठरले आहेत.

त्यांचा तपशील असा :

महाराष्ट्रामध्ये प्रथम: २६५ - चिपळूण विधानसभा मतदारसंघ (मतदार नोंदणी अधिकारी - आकाश लिगाडे)

महाराष्ट्रामध्ये द्वितीय: २६३ - दापोली विधानसभा मतदारसंघ (मतदार नोंदणी अधिकारी - डॉ. विजयकुमार सूर्यवंशी)

महाराष्ट्रामध्ये तृतीय: २६४ - गुहागर विधानसभा मतदारसंघ (मतदार नोंदणी अधिकारी - वैशाली पाटील).

या घवघवीत यशामध्ये तिन्ही मतदारसंघांतील सर्व सहायक मतदार नोंदणी अधिकारी, अतिरिक्त सहायक मतदार नोंदणी अधिकारी, निवडणूक नायब तहसीलदार, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO), सहायक मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (ABLO), BLO सुपरवायझर व डाटा एंट्री ऑपरेटर या सर्वांचा सिंहाचा वाटा असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande