लातूर - साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात; दिलीपराव देशमुख यांच्या हस्ते ध्वजारोहण
लातूर, 01 ऑगस्ट (हिं.स.)। साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रम उत्साहात आणि दिमाखात पार पडला. कार्यक्रमाला माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी त्यांच्या हस्ते मुख्य ध्वजार
अण्णाभाऊ साठे जयंती


लातूर, 01 ऑगस्ट (हिं.स.)।

साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रम उत्साहात आणि दिमाखात पार पडला. कार्यक्रमाला माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी त्यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहण करण्यात आले.

कार्यक्रमास महापौर जयश्री भालचंद्र सोनकांबळे, काँग्रेसचे नेते आबासाहेब पाटील सेलूकर, संतोष देशमुख, पृथ्वीराज शिरसाठ, प्रवीण कांबळे, शहर जिल्हाध्यक्ष शिवाजीराव जवळगेकर, प्रा. डॉ. माधव गादेकर, महानगरपालिकेचे गटनेते विजयकुमार साबदे, जयंती अध्यक्ष पिराजी साठे, माजी गटनेते सुनिल बसपुरे, नगरसेवक विकास कांबळे, माजी नगरसेविका महापुरे, अशोक देडे, दयानंद कांबळे, राज क्षीरसागर, जी. य. गायकवाड, आनंद वैरागे यांच्यासह समाजबांधव, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि अण्णाभाऊ प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपस्थित मान्यवरांनी साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. आण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. तसेच त्यांच्या समता, सामाजिक न्याय, बंधुता आणि मानवतेच्या विचारांचा समाजात अधिक व्यापक प्रसार करण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला.

कार्यक्रमात उपस्थितांनी डॉ. आण्णाभाऊ साठे यांच्या साहित्य, सामाजिक कार्य आणि परिवर्तनवादी विचारांचा गौरव करत त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन सामाजिक ऐक्य व समतेची भावना अधिक दृढ करण्याचे आवाहन केले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande