
नांदेड, 01 ऑगस्ट (हिं.स.)। नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेतर्फे दि.०१ ऑगस्ट २०२६ रोजी ‘साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे”यांच्या जयंती निमित्त त्यांच्या विद्युत भवन, नांदेड येथील पूर्णाकृती पुतळ्यास महापौर सौ.कविता संतोष मुळे आणि मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्राचे एक महान समाजसुधारक, लोकशाहीर आणि प्रसिद्ध लेखक होते. त्यांनी अनेक कादंबऱ्या, कथा आणि पोवाड्यांच्या माध्यमातून वंचितांच्या वेदनांना वाचा फोडली.'फकिरा' ही त्यांची गाजलेली कादंबरी असून, तिला १९६१ मध्ये राज्य सरकारचा उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार मिळाला. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात त्यांनी आपल्या शाहिरी व लेखणीने मोलाचे योगदान दिले.
याप्रसंगी माजी राज्यमंत्री डी.पी. सावंत, विधानपरिषद आमदार अमर राजुरकर, महापालिकेचे स्थायी समिती सभापती विरेंद्रसिंग गाडीवाले, महिला बाल कल्याण सभापती सदिच्छा सोनी पाटील, माजी सभापती किशोर स्वामी, भाजपा महिला आघाडीच्या प्रणिताताई चिखलीकर, प्रविण साले, नगरसेवक साहेबराव गायकवाड, उमेश पवळे, सुमित मुथा, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम,निलेश सुंकेवार, उपायुक्त स.अजितपालसिंग संधु, अभिजीत वायकोस, नितीन गाढवे, गंगाधर ईरलोड उपअभियंता प्रकाश कांबळे, संतोषभाऊ मुळे, विजय येवणकर, संघरत्न कांबळे, यांच्यासह मनपाचे कर्मचारी व शहरातील नागरीकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
---------------
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis