धोकादायक वीजतारा तातडीने हटवा; महापौर कोंड्याल यांच्या सूचना
सोलापूर, 01 ऑगस्ट (हिं.स.)। शहरातील वीजपुरवठा अधिक सुरक्षित, सक्षम आणि अखंडित करण्याच्या उद्देशाने महापौर कार्यालयात महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. महावितरण होल्डिंग कंपनीच्या स्वतंत्र संचालक नीता केळकर यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत महाप
Mahapor


सोलापूर, 01 ऑगस्ट (हिं.स.)।

शहरातील वीजपुरवठा अधिक सुरक्षित, सक्षम आणि अखंडित करण्याच्या उद्देशाने महापौर कार्यालयात महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. महावितरण होल्डिंग कंपनीच्या स्वतंत्र संचालक नीता केळकर यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत महापौर विनायक कोंड्याल यांनी शहरातील विविध प्रलंबित वीजविषयक कामांना गती देण्याच्या सूचना दिल्या.

बैठकीत हद्दवाढ भागात नवीन वीज उपकेंद्र (सबस्टेशन) उभारण्यासाठी आवश्यक जागा उपलब्ध करून देणे, धोकादायक स्थितीतील वीजतारा हटविणे आणि आवश्यक ठिकाणी भूमिगत वीज केबल टाकण्याबाबत सविस्तर चर्चा झाली.

तसेच नवीन केबल टर्मिनेशन, स्ट्रीट लाईटसाठी आवश्यक सर्व्हिस वायर आणि विद्युत जोडण्या उपलब्ध करून देणे, धोकादायक विद्युत वाहिन्यांचे स्थलांतर आणि शहरातील प्रमुख मिरवणूक मार्गावरील धोकादायक केबल तातडीने हटविण्याचे निर्देश महापौरांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले.

बैठकीला महावितरणचे वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी, महानगरपालिका अधिकारी तसेच सोलापूर चेंबर ऑफ कॉमर्स आणि यंत्रमागधारक संघाचे पदाधिकारी उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande