छ. संभाजीनगर - रोहिदास नगर येथील भव्य सामाजिक सभामंडपाच्या बांधकामाचे भूमिपूजन संपन्न
छत्रपती संभाजीनगर, 01 ऑगस्ट (हिं.स.)। साहित्यरत्न, लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त प्रभाग क्रमांक २४ येथील संत ज्ञानेश्वर कॉलनी, रोहिदास नगर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासमोर उभारण्यात येणाऱ्या भव्य सामाजिक सभ
अ


छत्रपती संभाजीनगर, 01 ऑगस्ट (हिं.स.)। साहित्यरत्न, लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त प्रभाग क्रमांक २४ येथील संत ज्ञानेश्वर कॉलनी, रोहिदास नगर येथे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यासमोर उभारण्यात येणाऱ्या भव्य सामाजिक सभामंडपाच्या बांधकामाचे भूमिपूजन अत्यंत उत्साहपूर्ण आणि सामाजिक ऐक्याच्या वातावरणात आमदार नारायण कुचे यांच्या हस्ते तसेच फुलंब्री विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ. अनुराधाताई अतुल चव्हाण यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.

लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या साहित्य, शाहिरी आणि सामाजिक कार्याच्या माध्यमातून वंचित, शोषित आणि कष्टकरी समाजाच्या वेदनांना वाचा फोडली. समता, बंधुता आणि सामाजिक न्यायाचा संदेश त्यांनी आपल्या लेखणीतून व कलाकृतीतून जनमानसापर्यंत पोहोचविला. त्यांच्या जयंतीनिमित्त उभारण्यात येणारा हा सामाजिक सभामंडप त्यांच्या विचारांचा वारसा जपणारा आणि समाजाला एकत्र आणणारा प्रेरणादायी उपक्रम ठरणार आहे. असे आमदार कुचे म्हणाले

या सभामंडपामुळे परिसरातील सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, धार्मिक तसेच विविध लोकहिताच्या कार्यक्रमांसाठी सुसज्ज व कायमस्वरूपी व्यासपीठ उपलब्ध होईल. स्थानिक नागरिकांच्या अनेक वर्षांच्या मागणीची पूर्तता होत असून, या विकासकामामुळे परिसराच्या सर्वांगीण प्रगतीला चालना मिळणार आहे. समाजातील सर्व घटकांना एकत्र आणून सामाजिक सलोखा, ऐक्य आणि विकासाची नवी दिशा देणारे हे काम निश्चितच ठरेल.

या प्रसंगी माजी महापौर भगवानबाबू घडामोडे, प्रभागाचे नगरसेवक सुनिल जगताप, कमलताई नरोटे, प्रभाग सभापती प्रियांका खोतकर, गंगाधर भवरे, मुक्ताताई ठुबे, दीपक खोतकर, रामचंद्र नरोटे, मोहन नाना साळवे, सुनील नाडे, लक्ष्मण लव्हाळे, रामभाऊ ठुबे, पंकज भावे, अवसरमल, मगरे, पारस्कर समितीचे सदस्य जगन मस्के, प्रकाश निकाळजे, मिलिंद नाडे, बाबुराव थोरात, विठ्ठल नाळे, बाबुराव मोघे, अतुल त्रिभुवन, निर्मलाताई पाटील तसेच अनेक ज्येष्ठ नागरिक, महिला भगिनी, युवक आणि समस्त समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जीवनकार्याला अभिवादन करून त्यांच्या विचारांवर चालत सामाजिक समता, शिक्षण, प्रगती आणि बंधुभावाची मूल्ये अधिक दृढ करण्याचा संकल्प व्यक्त केला. विकासकामे ही केवळ पायाभूत सुविधा उभारण्यापुरती मर्यादित नसून समाजाला एकत्र आणण्याचे प्रभावी माध्यम आहेत, ही भावना यावेळी सर्वांनी व्यक्त केली.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतलेल्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, स्थानिक नागरिक आणि समाजबांधवांचे मनःपूर्वक आभार. लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या प्रेरणादायी विचारांच्या मार्गदर्शनाखाली समाजहिताची आणि विकासाची वाटचाल अधिक वेगाने सुरू राहील, असा विश्वास व्यक्त करतो. असे ते म्हणाले

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande