
छत्रपती संभाजीनगर, 01 ऑगस्ट (हिं.स.)। आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त अण्णाभाऊ साठे चौक, जिल्हाधिकारी कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार पालकमंत्री संजय शिरसाट यांनी अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.
आपल्या लेखणीतून व शाहिरीतून समाजातील वंचित, शोषित आणि कष्टकरी जनतेच्या वेदनांना वाचा फोडणारे, सामाजिक समता, न्याय आणि स्वाभिमानाचा विचार जनमानसात रुजविणारे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे कार्य आजही प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. असे पालकमंत्री शिरसाट म्हणाले
त्यांच्या विचारांचा आणि सामाजिक परिवर्तनाच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवत समता, बंधुता आणि मानवतेच्या मूल्यांचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प करूया असे त्यांनी सांगितले
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis