
छत्रपती संभाजीनगर, 01 ऑगस्ट (हिं.स.)।
डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त अभिवादनाचा कार्यक्रम शनिवारी (दि.एक) हा घेण्यात आला.
मुख्य ईमारतीत आयोजित या कार्यक्रमात कुलगुरु डॉ.विजय फुलारी यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. यावेळी प्रकुलगुरू डॉ.प्रवीण वक्ते, कुलसचिव डॉ.प्रशांत अमृतकर, अधिष्ठाता डॉ.भास्कर साठे, परीक्षा मंडळ संचालक डॉ.बी.एन.डोळे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis