
छत्रपती संभाजीनगर, 01 ऑगस्ट (हिं.स.)।
केंद्रीय पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी घेतले छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील श्री घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन आज घेतले
केंद्रीय पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी श् श्री घृष्णेश्वर ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेऊन अभिषेक व पूजा केली. दर्शनानंतर संस्थानच्या वतीने त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मंदिर परिसरातील व्यवस्थेची पाहणी करत त्यांनी भाविकांसाठी करण्यात आलेल्या सुविधांची माहिती घेतली. दर्शनानंतर अभिप्राय नोंदवहीत त्यांनी आपल्या भावना व्यक्त करत श्री घृष्णेश्वर देवस्थानच्या व्यवस्थापनाचे कौतुक केले. त्यांच्या भेटीला धार्मिकदृष्ट्या विशेष महत्त्व प्राप्त झाले.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis