सायबर फ्रॉडने पसरले पाय - २० राज्यांत वापरले युवकाचे बँक खाते
अमरावती, 01 ऑगस्ट (हिं.स.) गोरगरिबांना आमीषे दाखवून त्यांच्या बँकखात्यांचा सायबर गुन्हेगारांकडून गैरवापर केल्यात जात आहे. शहरातील एका युवकाच्या बँक खात्याचा वापर सायबर फॉडसाठी तब्बल २० राज्यामध्ये केल्या गेल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. शेख
२० राज्यात वापरले युवकाचे बँकखाते


अमरावती, 01 ऑगस्ट (हिं.स.)

गोरगरिबांना आमीषे दाखवून त्यांच्या बँकखात्यांचा सायबर गुन्हेगारांकडून गैरवापर केल्यात जात आहे. शहरातील एका युवकाच्या बँक खात्याचा वापर सायबर फॉडसाठी तब्बल २० राज्यामध्ये केल्या गेल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. शेख अमीन शेख लतीफ (रा. राहूलनगर, बिच्छूटेकडी) असे स्वत:चे खाते दुसऱ्याला वापरायला देणाऱ्या संशयित युवकाचे नाव आहे. त्याच्याविरुद्ध आयुक्तालयातील सायबर ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित शेख अमीन याने अमरावतीच्या बँक ऑफ इंडियामध्ये खाते काढले होते. त्याला त्याचा मोबाईल क्रमांक संलग्न करून दिला होता. ते सीमकार्ड व बँकेचे पासबुक, एटीएम कार्ड हे त्याने सायबर गुन्हेगाराला वापराला दिले होते. त्यासाठी संशयित शेख अमीन शेख लतीफ याला काही पैसे मिळाले होते. मागील काही दिवसांपासून सायबर फ्रॉड मोठ्या प्रमाणात होत असल्यामुळे त्यावर भारत सरकारच्या संबंधित विभागाची देशभरात करडी नजर आहे. आतापर्यंत ज्यांनी, ज्यांनी स्वत:ची बँकखाती ही सायबर गुन्हेगारांना वापरायला दिली आहे. त्यांची माहिती संकलित करून संबंधित राज्याच्या गृहविभागाला पाठविण्यात येत असून, त्यातून असे प्रकार पुढे येत आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर सायबर पोलिसांचे एक पथक त्याच्या संबंधित पत्यावर जाऊन आले असता, तो आढळून आला नाही. असे अधिकाऱ्यांनी सांगितले. सायबर पोलिसांनी संशयित शेख अमीन शेख लतीफ याच्या अकाउंटची माहिती बँक ऑफ इंडियाकडून मागितली असता त्याच्या बँक खात्यामध्ये देशातील वीस प्रमुख राज्यामध्ये जे सायबर गुन्हे घडले त्याची मोठी रक्कम जमा झाल्याची बाब निदर्शनात आली आहे.

७० ते ८० लाख जमा

संशयित शेख अमीन शेख लतीफ याचे बँकखाते वीस राज्यातील गुन्ह्यासाठी वापरल्या गेले. त्यामध्ये आतापर्यंत ७० ते ८० लाखांच्या आसपास रक्कम जमा झाल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

तळेगावच्या युवकाविरुद्धही गुन्हा

शिरजगावकसबा येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत आवेश संजय विरघट (वय २२, रा. तळेगाव मोहना, ता. चांदूरबाजार ) या युवकाने खाते उघडले. त्या खाते वापरण्यासाठी त्याने दुसऱ्याला दिले. त्याचे खाते गुजरात राज्यात वापरल्या गेले. सदर बँकखात्यात सायबर फ्रॉडचे १ लाख ६१ हजार ४०० रुपये जमा झाले. पोर्टलवरुन प्राप्त माहितीचे आधारे शिरजगावकसबा पोलिसांनी आवेश विरघटविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. असे ठाणेदार अमन शिरसाट यांनी सांगितले.

---------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande