
सोलापूर, 01 ऑगस्ट (हिं.स.) साहित्यसम्राट बहुउद्देशीय सामाजिक संस्था, सोलापूर तसेच बहुजन रयत परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने साहित्यरत्न लोकशाहीर डॉ. अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यात आली. यावेळी सोलापूर महानगरपालिकेचे महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, महिला व बालकल्याण समिती सभापती निर्मला जंगम, शहराध्यक्ष तथा नगरसेविका रोहिणी तडवळकर, नगरसेविका श्रीदेवी फुलारी, कल्पना कदम, नगरसेवक विनोद भोसले, समाधान आवळे, सुरेश पाटोळे, मधुसूदन जंगम, नागेश खरात, विशाल माने, मध्यवर्ती अध्यक्ष साक्षात लोखंडे, ॲड. शैलेश पोटफोडे, श्रीकांत बोराडे, राजू क्षीरसागर, लखन गायकवाड यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे संस्थापक अभिषेक खंदारे आणि राजू मिश्रे होते. तसेच संस्थेच्या आधारस्तंभ कोमलताई साळुंखे, विशाल खंदारे, उत्सवाध्यक्ष अमित तांबे, उपाध्यक्ष विशाल उखडे, कार्याध्यक्ष यश पांढरे, डीडी पांढरे, पृथ्वीराज मोरे यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. साहित्यरत्न डॉ. अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांना अभिवादन करत सामाजिक समतेचा आणि परिवर्तनाचा संदेश देणारा हा कार्यक्रम उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला.
---------------
हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड