मनोरुग्ण संजय राऊत, उद्धव ठाकरेंना मानसोपचाराची गरज - नवनाथ बन
मुंबई, 01 ऑगस्ट (हिं.स.)। संजय राऊत, तुम्हाला आणि तुमचे मालक उद्धव ठाकरेंना यांना अभिजीत दिपकेमध्ये विष्णूचा अवतार दिसतो, याला मानसिक रुग्णावस्था म्हणतात. तुम्हाला मानसिक उपचाराची गरज आहे आणि तुमचा उपचार महाराष्ट्रात होणार नसल्याने आम्ही वर्गणी काढ
मनोरुग्ण संजय राऊत, उद्धव ठाकरेंना मानसोपचाराची गरज* भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन


मुंबई, 01 ऑगस्ट (हिं.स.)। संजय राऊत, तुम्हाला आणि तुमचे मालक उद्धव ठाकरेंना यांना अभिजीत दिपकेमध्ये विष्णूचा अवतार दिसतो, याला मानसिक रुग्णावस्था म्हणतात. तुम्हाला मानसिक उपचाराची गरज आहे आणि तुमचा उपचार महाराष्ट्रात होणार नसल्याने आम्ही वर्गणी काढून सिंगापूरच्या रुग्णालयात तुमच्यावर मानसिक उपचार करू. अभिजीत दिपकेची विष्णूच्या अवताराबरोबर तुलना करता आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर टीका करता यावरूनच तुमच्या गोळ्या संपलेल्या आहेत, हे महाराष्ट्राच्या लक्षात आले आहे, असा प्रहार भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शनिवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

महाराष्ट्रातल्या जनतेने पळवून लावल्याने तुमची पळता भुई थोडी झाली आहे. अमितभाई शाह या देशाचे गृहमंत्री आहेत आणि त्यांनी कलम 370 हटवले. पळून जाणाऱ्यांमधले अमितभाई नाहीत, तर संजय राऊत आणि उद्धव ठाकरे हे दोघे पळपुटे आहेत. तुम्हाला वंदे मातरम् सक्तीचे विधेयक चालत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमितभाई शाह यांनी त्याबाबत संसदेत कायदा पारित केला आणि आता तुमच्यासारख्या देशद्रोह्यांच्या बुडाला आग लागल्यानेच तुम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमितभाई यांच्यावर टीका करता, असे बन यांनी सुनावले.

मुळात संजय राऊत हे उबाठा गटाची जमीन भुसभुशीत करणारे गांडूळ आहेत, असे सांगून बन म्हणाले, गांडुळासारखा दुतोंडीपणा तुम्ही करता हे महाराष्ट्राने पाहिले आहे. जयकुमार गोरे यांच्यावर टीका करू नका. ते काय आहेत, हे महाराष्ट्राला माहिती आहे. त्यांना चार वेळा जनतेने निवडून दिले आहे आणि तुम्हाला अजून भांडुपचा नगरसेवकही निवडून आणता आला नाही. गृहमंत्रालयाचा लिलाव करण्याची कुवत आणि वकूब तुमच्यात नाही. तुमच्या उबाठा गटाचाच लिलाव झाला आहे. स्वतःच्या खासदारकीचा आणि हिंदुत्वाचा लिलाव करून तुम्ही तुमचा पक्ष काँग्रेसच्या दावणीला बांधला आहे. आता या देशाचा लिलाव करण्याचे स्वप्न तुम्ही पाहत आहात. परंतु या देशातील तरुणाई आणि देशातील नागरिक पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या पाठीशी आहेत. तुमचे हे स्वप्न कधीही पूर्ण होणार नाही.

पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी मोठ्या मनाने या तरुणांशी संवाद साधत सांगितले की, एखादा तरुण चुकला तर त्याला सोबत घेतले पाहिजे. आपल्याला देश पुढे न्यायचा आहे, भारताचे भविष्य घडवायचे आहे. सगळ्यांना सोबत येऊन देशासाठी काम करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि या तरुणांचे नाते आजोबा आणि नातवाचे आहे. संजय राऊत मात्र कंसमामा प्रमाणे वागत आहेत. जेन झीशी तुम्हाला काही काहीही देणे-घेणे नाही. तुम्हाला फक्त तुमची राजकीय पोळी भाजायची आहे. स्वत:ची खासदारकी आणि भावाची आमदारकी टिकवायची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी या तरुणांसोबत आहेत. याच तरुणांच्या आशीर्वादाने 2014 ला नरेंद्र मोदीजी पंतप्रधान झाले, 2019 आणि 2024 ला पुन्हा सत्तेत आले आणि याच तरुणांच्या पाठिंब्यामुळे 2029 मध्येही पंतप्रधान नरेंद्र मोदीजी चौथ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतील. मतांच्या माध्यमातून तुमच्या पक्षाचा वध करण्याचे काम महाराष्ट्रातल्या जनतेने याआधी केले आहे आणि 2029 मध्येही तुम्हाला घरी बसवले जाईल, अशा शब्दात बन यांनी खरडपट्टी काढली.

---------------

हिंदुस्थान समाचार / हर्षदा गावकर


 rajesh pande