जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातील एएसडीडी यादीबाबत  ३ ऑगस्टला राजकीय पक्षांची बैठक
जळगाव, 01 ऑगस्ट (हिं.स.) | जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत दिनांक ८ ऑगस्ट २०२६ ही प्रगणना पत्र (ईएफ) भरण्यासाठी मतदारांची अंतिम मुदत आहे. या पार्श्वभूमीवर बूथ लेव्हल अधिकारी (बीएलओ) यांनी घरो
जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातील एएसडीडी यादीबाबत  ३ ऑगस्टला राजकीय पक्षांची बैठक


जळगाव, 01 ऑगस्ट (हिं.स.) | जळगाव शहर विधानसभा मतदारसंघातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत दिनांक ८ ऑगस्ट २०२६ ही प्रगणना पत्र (ईएफ) भरण्यासाठी मतदारांची अंतिम मुदत आहे. या पार्श्वभूमीवर बूथ लेव्हल अधिकारी (बीएलओ) यांनी घरोघरी भेटी देऊन गैरहजर, मयत, दुबार व स्थलांतरित (एएसडीडी) मतदारांची यादी तयार केली आहे. या नावांचा समावेश दिनांक १७ ऑगस्ट २०२६ रोजी प्रसिद्ध होणाऱ्या प्रारूप मतदार यादीतून वगळण्यात येणार आहे. गैरहजर व स्थलांतरित मतदारांच्या याद्यांची तपासणी व पडताळणी करण्यासाठी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक दिनांक ३ ऑगस्ट,२०२६ रोजी दुपारी ४.३० वाजता अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, जळगाव येथे आयोजित करण्यात आली आहे.

बैठकीसंदर्भात संबंधित राजकीय पक्षांना पत्रव्यवहारही करण्यात आला आहे. तरी जळगाव शहरातील सर्व राजकीय पक्षांच्या शहराध्यक्षांनी बैठकीस उपस्थित राहावे, असे आवाहन विनय गोसावी उपविभागीय अधिकारी, जळगाव तथा मतदान नोंदणी अधिकारी, १३-जळगाव विधानसभा मतदारसंघ यांनी केले आहे. ही बैठक केवळ १३-जळगाव विधानसभा मतदारसंघासाठी आयोजित करण्यात आली असल्याचेही कळविण्यात आले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande