मेळघाटच्या सीमेवर १३ पिस्तुल जप्त
अमरावती, 13 ऑगस्ट (हिं.स.)। मेळघाटपासून केवळ ९ किलोमीटर अंतरावरील मध्य प्रदेशातील खकनार गावाजवळ शक्तीसिंग बादलसिंग सिकलीगर याच्याकडून पाचोरी निर्मित १३ बंदूक आणि ४५ जिवंत गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. मध्य प्रदेश आण
मेळघाटच्या सीमेवर १३ पिस्तुल जप्त


अमरावती, 13 ऑगस्ट (हिं.स.)। मेळघाटपासून केवळ ९ किलोमीटर अंतरावरील मध्य प्रदेशातील खकनार गावाजवळ शक्तीसिंग बादलसिंग सिकलीगर याच्याकडून पाचोरी निर्मित १३ बंदूक आणि ४५ जिवंत गोळ्या जप्त करण्यात आल्या आहेत. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राच्या सीमेवर असलेल्या पाचोरी गावात आजही जपान बनावटीच्या आणि ब्रांडेड कंपनीच्या हुबेहूब पिस्तुली, मॅगझिन तथा काडतूस तयार करणे सुरू आहे. गेल्या एका वर्षात १२ प्रकरणात ४७ पिस्तुल आणि असंख्य जिवंत काडतुसे पकडली गेली असा खुलासा बुरहानपूर पोलिस अधीक्षक आशुतोष बागरी यांनी केला. खकनार जवळच्या जंगलात एक अज्ञात व्यक्ती पिस्तुली घेऊन लपलेला असल्याची माहिती ठाणेदार अभिषेक जाधव यांना प्राप्त होताच पोलिस पथकाने मोक्यावर धाव घेतली. शक्तीसिंग यास अटक केली. त्याच्याकडून १३ पिस्तुल, १ मॅगझिन आणि सोबत ४५ काडतुसे जप्त करण्यात आली. खकनार पोलिस ठाणेअंतर्गत असलेले पाचोरी गाव अगदी राज्याच्या सीमेवर आहे.

पोलिस कारवाईची भनक लागताच शस्त्र तस्करी करणारे मेळघाटच्या जंगलात शरण घेत पोलिसांना हुलकावणी देत असतात. पोलिस अधीक्षक आशुतोष बागरी यांच्या मार्गदर्शनात प्रदीप शेंडे, सुरेश महाले, अभिषेक जाधव या अधिकाऱ्यांनी व त्यांच्या कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. जप्त शस्त्रांची किमत ४.७२ लाख आहे. मुख्य आरोपी शक्तीसिंग मध्यप्रदेशातील ओझर नागलवाडी गावाचा रहिवाशी आहे. मध्य प्रदेशातील ठाण्यांमध्ये शक्तीचा रेकॉर्ड तपासला जात आहे. मागील २० वर्षांत पाचोरी गावात अनेक वेळा पोलिस कारवाई झालेली असूनही अवैध हत्यारे बनविण्याचे घरगुती कारखाने बंद पडलेले नाहीत.

---------------

हिंदुस्थान समाचार / अरुण जोशी


 rajesh pande