जळगावच्या बिबा नगरमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा भंडाफोड
पोलिसांनी दोन महिलांसह एका तरुणाला घेतले ताब्यात जळगाव, १४ ऑगस्ट (हिं.स.) | शहरातील बिबा नगर परिसरातील एका घरात सुरू असलेल्या कथित वेश्या व्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केला. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित घरावर छापा टाकून दोन महिला आणि
जळगावच्या बिबा नगरमध्ये सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाचा भंडाफोड


पोलिसांनी दोन महिलांसह एका तरुणाला घेतले ताब्यात

जळगाव, १४ ऑगस्ट (हिं.स.) | शहरातील बिबा नगर परिसरातील एका घरात सुरू असलेल्या कथित वेश्या व्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केला. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संबंधित घरावर छापा टाकून दोन महिला आणि एका तरुणाला ताब्यात घेतले.

मिळालेल्या माहितीनुसार, गेल्या दोन महिन्यांपासून या घरात संशयास्पद हालचाली सुरू असल्याचे परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास आले होते. घरात महिला तसेच काही पुरुषांची वारंवार ये-जा होत असल्याने नागरिकांमध्ये संशय निर्माण झाला होता.

याबाबतची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी गोपनीय पद्धतीने माहितीची खातरजमा केली. त्यानंतर गुरुवारी सायंकाळी संबंधित घरावर छापा टाकण्यात आला. या कारवाईदरम्यान दोन महिला आणि एका तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले.

भरनागरी वस्तीमध्ये अशा प्रकारचा व्यवसाय सुरू असल्याचे समोर आल्याने परिसरातील नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी पोलिसांकडून पुढील कायदेशीर कारवाई सुरू असल्याचे सांगण्यात आले.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande