नांदेड : मुदखेड पोलिसांची जुगार अड्डयावर धाड; ८ आरोपींना अटक, ३.५८ लाखांचा मुद्देमाल जप्त
नांदेड, 14 ऑगस्ट (हिं.स.)।नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरुद्धच्या विशेष मोहिमेत मुदखेड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मुदखेड रेल्वे पटरीजवळ, मढका शिवारात सुरू असलेल्या
Q


नांदेड, 14 ऑगस्ट (हिं.स.)।नांदेड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांविरुद्धच्या विशेष मोहिमेत मुदखेड पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. मुदखेड रेल्वे पटरीजवळ, मढका शिवारात सुरू असलेल्या जुगार अड्डयावर पोलिसांनी धाड टाकून ८ जणांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून एकूण ३,५८,७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

मुदखेड पोलीस पथक गस्तीवर असताना त्यांना मढका शिवारात तिरट नावाचा जुगार खेळला जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली. या माहितीवरून पोलिसांनी पंचांसह घटनास्थळी छापा टाकला. पोलिसांची चाहूल लागताच काही आरोपी पळून गेले, मात्र पोलिसांनी ८ जणांना जागीच पकडले.

या कारवाईत पोलिसांनी खालील मुद्देमाल जप्त केला आहे:

रोख रक्कम: ३,७०० रुपये

मोबाईल फोन: २ नग (किंमत अंदाजे २५,००० रुपये)

दुचाकी वाहने: ५ नग (किंमत अंदाजे ३,३०,००० रुपये)

इतर साहित्य: जुगाराची ५२ पाने (कार्ड्स)

: ही यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. नीलाभ रोहन यांच्या आदेशानुसार पार पडली. या पथकात मुदखेड पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोलीस निरीक्षक धीरज चव्हाण, पोलीस उप निरीक्षक राजेश नंद,आकाश सरोदे आणि पोलीस अंमलदार महकुमार कवठेकर, शंकर बैसनवाड, गडे, कदम, भिसे व झुंझारे यांचा समावेश होता.

-----------------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande