उदगीरमध्ये अनैतिक व्यवसायाविरोधात पोलिसांची कारवाई; पाच महिलांची सुटका
लातूर, १४ ऑगस्ट (हिं.स.) : उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या अनैतिक व्यवसायाविरोधात पोलिसांनी धडक कारवाई करत एका आरोपीला अटक केली. नांदेड रोडवरील अशोका पॅलेस हॉटेल येथे ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत पाच पीडित महिलांची सुटका कर
उदगीर ग्रामीण पोलीस ठाणे


लातूर, १४ ऑगस्ट (हिं.स.) : उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या अनैतिक व्यवसायाविरोधात पोलिसांनी धडक कारवाई करत एका आरोपीला अटक केली. नांदेड रोडवरील अशोका पॅलेस हॉटेल येथे ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत पाच पीडित महिलांची सुटका करण्यात आली असून, त्यांना सुधारगृहात ठेवण्यात आले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोका पॅलेस हॉटेलमध्ये अनैतिक व्यवसाय सुरू असल्याची माहिती उदगीर ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलिसांनी हॉटेलवर कारवाई केली.

कारवाईदरम्यान अहमद जलील बागवान (वय ३३, रा. बोधन नगर, जळकोट रोड, उदगीर) हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी महिलांना हॉटेलवर बोलावून आणत असल्याचे तसेच पैशांचे आमिष दाखवून त्यांना अनैतिक व्यवसाय करण्यास प्रवृत्त करीत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अटक केली.

या प्रकरणी पोलीस अंमलदार संदीप बाबुराव केन्द्रे यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ५६९/२०२६ दाखल करण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध अनैतिक व्यवसाय प्रतिबंध अधिनियम, १९५६ मधील कलम ३, ४, ५, ७ तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलम १४३ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

या प्रकरणातील पाच महिलांना सुधारगृहात ठेवण्यात आले असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक दिलीप गाडे करीत आहेत.

ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी भातलवंडे, पोलीस निरीक्षक दिलीप गाडे, पोलीस निरीक्षक भुसनूर, उदगीर शहर तसेच त्यांच्या पथकाने केली.

दरम्यान, उदगीर ग्रामीण पोलिसांकडून अनैतिक व्यवसायासह विविध अवैध कृत्यांना आळा घालण्यासाठी हॉटेल, लॉज आणि इतर संवेदनशील ठिकाणांवर नियमितपणे लक्ष ठेवण्यात येत आहे. अशा अवैध कृत्यांविरोधात यापुढेही आवश्यक ती कायदेशीर कारवाई सुरूच राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.

--------------------

हिंदुस्थान समाचार / Mahesh Madanrao Chitnis


 rajesh pande