
रत्नागिरी, 18 ऑगस्ट, (हिं.स.) । गोवळकोट (ता. चिपळूण) येथील कालपासून बेपत्ता असलेले जावेद सुर्वे आणि सलीम पटेल यांचे मृतदेह आज बुधल (ता. गुहागर) समुद्रकिनारी आढळले. दोघेही काल दुपारी मासेमारी करण्यासाठी समुद्रात गेले होते. त्यानंतर ते बेपत्ता झाले होते. कुटुंबीय आणि स्थानिकांकडून त्यांचा शोध घेतला जात असतानाच आज सकाळी बुधल समुद्रकिनारी स्थानिक मच्छिमारांना दोघेही मृतावस्थेत आढळून आले.
घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. दोघांच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
---------------
हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी