परभणी - विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून दिला स्वच्छतेचा मूलमंत्र
परभणी, 18 ऑगस्ट, (हिं.स.) - भारत सरकारच्या युवा कार्यक्रम तथा खेल मंत्रालय यांच्या वतीने मेरा युवा भारत उपक्रमांतर्गत आयोजित स्वच्छता पखवाड्यानिमित्त शहरातील श्री शिवाजी महाविद्यालतील सांस्कृतिक विभागाच्या कलापथकाने पथनाट्यातून स्वच्छतेचा मूलमंत्र
विद्यार्थ्यांनी पथनाट्यातून दिला स्वच्छतेचा मूलमंत्र -श्री शिवाजी महाविद्यालयाचा उपक्रम


परभणी, 18 ऑगस्ट, (हिं.स.) - भारत सरकारच्या युवा कार्यक्रम तथा खेल मंत्रालय यांच्या वतीने मेरा युवा भारत उपक्रमांतर्गत आयोजित स्वच्छता पखवाड्यानिमित्त शहरातील श्री शिवाजी महाविद्यालतील सांस्कृतिक विभागाच्या कलापथकाने पथनाट्यातून स्वच्छतेचा मूलमंत्र देऊन स्वच्छत्याविषयी जनजागृती केली.

कलापथकातील विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचे महत्त्व, वैयक्तिक स्वच्छता, सार्वजनिक स्वच्छता, कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छ परिसराची जबाबदारी याबाबत प्रभावी पथनाट्य सादर करून समाजप्रबोधन केले. या पथकाने मध्यवर्ती बसस्थानक, कै. कमलताई जामकर महिला महाविद्यालय तसेच श्री शिवाजी महाविद्यालयात पथनाट्याच्या माध्यमातून स्वच्छता जनजागृती करण्यात आली. यात विनोदी संवाद, प्रभावी घोषणा, समूहगीत आणि वास्तववादी प्रसंगांच्या माध्यमातून स्वच्छता ही केवळ शासनाची नव्हे, तर प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आह हा संदेश देण्यात आला. कचरा कुठेही न टाकणे, ओला-सुका कचरा वेगळा करणे, प्लास्टिकचा मर्यादित वापर करणे आणि परिसर स्वच्छ ठेवणे याबाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी उपस्थितांना स्वच्छतेची सामूहिक शपथही देखील देण्यात आली.सहभागी विद्यार्थ्यांना प्राचार्य डॉ. बाळासाहेब जाधव, उपप्राचार्य श्रीनिवास केशट्टी, उपप्राचार्य प्रा. नारायण राऊत, ग्रंथपाल डॉ. रामदास टेकाळे, सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. प्रल्हाद भोपे तसेच जिल्हा युवा अधिकारी प्रणित सांगवीकर, सहायक कक्ष अधिकारी गजानन गाडेकर यांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. या पथकात प्रा. कृष्णा शिनगारे, हरिओम घोलप, प्राची चांदणे, साधना चट्टे, सायली चट्टे, श्रद्धा देशमुख व रिया भागवत यांनी सक्रिय सहभाग घेतला.

---------------

हिंदुस्थान समाचार / Chaitanya JayantRao Chitnis


 rajesh pande