
नांदेड, 18 ऑगस्ट (हिं.स.)। सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प किनवट यांच्या अधिनस्त असलेल्या आदिवासी मुलांच्या शासकीय वसतिगृह माहूरसाठी इमारत भाडेतत्त्वावर घेणे आवश्यक आहे.
75 प्रवेश क्षमतेच्या या वसतिगृहासाठी #माहूर शहरात सर्व सोयी-सुविधांनी युक्त, 20 ते 25 खोल्या असलेली तसेच बारमाही पाणी उपलब्ध असलेली इमारत आवश्यक आहे. इच्छुक इमारत मालकांनी आपली इमारत उपलब्ध असल्यास गृहपाल, आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह, माहूर (रेणुका भक्त निवासच्या पाठीमागे) यांच्याशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी भ्रमणध्वनी क्रमांक 7038649239 वर संपर्क साधावा, असे आवाहन आदिवासी मुलांचे शासकीय वसतिगृह माहूर जिल्हा नांदेड यांनी केले आहे.
हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis