नांदेडमध्ये मोटारसायकल वाहनांसाठी MH 26-DD नवीन मालिका सुरू होणार
नांदेड, 18 ऑगस्ट, (हिं.स.)। परिवहनेतर संवर्गातील मोटारसायकल वाहनांच्या नोंदणीसाठी MH 26-DD ही नवीन मालिका लवकरच सुरू करण्यात येणार आहे. ज्या अर्जदारांना पसंतीचा क्रमांक घ्यावयाचा आहे, त्यांचे अर्ज आधारकार्ड, पॅनकार्ड, मोबाईल क्रमांक आणि ई-मेल यासह
नांदेडमध्ये मोटारसायकल वाहनांसाठी MH 26-DD नवीन मालिका सुरू होणार


नांदेड, 18 ऑगस्ट, (हिं.स.)। परिवहनेतर संवर्गातील मोटारसायकल वाहनांच्या नोंदणीसाठी MH 26-DD ही नवीन मालिका लवकरच सुरू करण्यात येणार आहे.

ज्या अर्जदारांना पसंतीचा क्रमांक घ्यावयाचा आहे, त्यांचे अर्ज आधारकार्ड, पॅनकार्ड, मोबाईल क्रमांक आणि ई-मेल यासह गुरुवार 20 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी 2.30 वाजेपर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत. अर्जासोबत संबंधित पसंती क्रमांकाच्या शुल्काचा धनादेश (डीडी) सादर करणे आवश्यक आहे.

विहित दिनांक व वेळेनंतर पसंती क्रमांकासाठी अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. एखाद्या पसंती क्रमांकासाठी एकापेक्षा अधिक अर्ज प्राप्त झाल्यास, संबंधित अर्जदारांना 20 ऑगस्ट रोजी दुपारी 4 वाजता दूरध्वनीद्वारे कळविण्यात येईल. जिल्ह्यातील नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन नांदेडचे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Sangita Hanumant Rao Chitanis


 rajesh pande