अक्कलकोट मतदारसंघातील शेतकऱ्यांचा सिंगल फेज वीजप्रश्न मार्गी
सोलापूर, 18 ऑगस्ट (हिं.स.)। अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील शेतकरी आणि वाड्या-वस्त्यांवरील वीजपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. मुळेगावसह मतदारसंघातील सुमारे १५ ते १६ गावांमधील सिंगल फेज वीजपुरवठ्याची समस्या सोडविण्यात यश आले असल्याचा दावा करण्यात
grdf


सोलापूर, 18 ऑगस्ट (हिं.स.)। अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील शेतकरी आणि वाड्या-वस्त्यांवरील वीजपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. मुळेगावसह मतदारसंघातील सुमारे १५ ते १६ गावांमधील सिंगल फेज वीजपुरवठ्याची समस्या सोडविण्यात यश आले असल्याचा दावा करण्यात आला आहे.

अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या माध्यमातून तसेच जिल्हा परिषद सदस्य नेताजी खंडागळे यांनी जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत महावितरणच्या अधिकाऱ्यांसमोर शेतकरी आणि वाड्या-वस्त्यांवरील वीज समस्यांचा मुद्दा सातत्याने मांडला. त्याचा पाठपुरावा केल्यानंतर संबंधित गावांमधील सिंगल फेज वीजपुरवठ्याचा प्रश्न मार्गी लागल्याचे सांगण्यात आले. वीजपुरवठ्याच्या समस्येमुळे शेतकऱ्यांना शेतीकामात अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामुळे हा प्रश्न मार्गी लागल्याने शेतकरी व ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. या महत्त्वपूर्ण कामाबद्दल मुळेगाव व दोड्डी परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांच्या वतीने आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि जिल्हा परिषद सदस्य नेताजी खंडागळे यांचा सत्कार करून आभार व्यक्त करण्यात आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande