रत्नागिरीच्या माजी नगरसेविका राजश्री शिवलकर यांचे निधन
रत्नागिरी, 18 ऑगस्ट (हिं.स.) । येथील मांडवी परिसराच्या माजी नगरसेविका राजश्री बिपीन शिवलकर (वय ५२) यांचे सोमवारी मध्यरात्री उपचारांदरम्यान कोल्हापूर येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे असा परिवार आहे. आठ दिवसांपूर्वी राजश्री शिवलकर यांन
राजश्री शिवलकर


रत्नागिरी, 18 ऑगस्ट (हिं.स.) । येथील मांडवी परिसराच्या माजी नगरसेविका राजश्री बिपीन शिवलकर (वय ५२) यांचे सोमवारी मध्यरात्री उपचारांदरम्यान कोल्हापूर येथे निधन झाले. त्यांच्या पश्चात पती, दोन मुलगे असा परिवार आहे. आठ दिवसांपूर्वी राजश्री शिवलकर यांना घरी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांना तातडीने रत्नागिरीतील रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती बिघडल्याने अधिक उपचारासाठी त्यांना कोल्हापूर येथील रुग्णालयात हलवण्यात आले होते. तेथे उपचार सुरू असतानाच सोमवारी मध्यरात्री त्यांचे निधन झाले.

राजश्री शिवलकर महाविद्यालयीन जीवनापासूनच अत्यंत मृदूभाषी, प्रेमळ आणि सर्वांशी मिळूनमिसळून वागणूक असणाऱ्या व्यक्तिमत्त्वाच्या म्हणून परिचित होत्या. त्यांनी मांडवी भागातून भाजपच्या नगरसेविका म्हणून काही काळ यशस्वी जनसेवा केली होती. प्रभागाच्या विकासात त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण होते. मंगळवारी दुपारी १२ वाजता त्यांची अंत्ययात्रा त्यांच्या मांडवी येथील राहत्या घरून निघाली. मिरकरवाडा येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. राजश्री शिवलकर यांच्या निधनाबद्दल मित्रपरिवार, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील मान्यवरांकडून तीव्र शोक व्यक्त केला जात आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / रत्नागिरी


 rajesh pande