मराठवाड्यात २० ते २२ ऑगस्टदरम्यान तुरळक पावसाची शक्यता
छत्रपती संभाजीनगर, 18 ऑगस्ट (हिं.स.)। प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबईकडून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार, मराठवाड्यात २०, २१ आणि २२ ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. सध्या मराठवाड्यात पावसाचा खंड जाणवत असताना पुढील काही दिवसांत काही जि
मराठवाड्यात २० ते २२ ऑगस्टदरम्यान तुरळक पावसाची शक्यता


छत्रपती संभाजीनगर, 18 ऑगस्ट (हिं.स.)। प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबईकडून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार, मराठवाड्यात २०, २१ आणि २२ ऑगस्ट रोजी तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. सध्या मराठवाड्यात पावसाचा खंड जाणवत असताना पुढील काही दिवसांत काही जिल्ह्यांना पावसाची प्रतीक्षा संपण्याची शक्यता आहे.

२० ऑगस्ट रोजी परभणी, हिंगोली, नांदेड आणि जालना जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. त्याच दिवशी छत्रपती संभाजीनगर, लातूर आणि बीड जिल्ह्यांत काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. तसेच २१ ऑगस्ट रोजी नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. २२ ऑगस्ट रोजीही मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता कायम राहणार आहे.

दरम्यान, पुढील तीन दिवसांत मराठवाड्यातील कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नसून त्यानंतर कमाल तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. पुढील पाच दिवसांत किमान तापमानात मात्र फारसा बदल अपेक्षित नसल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis


 rajesh pande