
छत्रपती संभाजीनगर, 18 ऑगस्ट (हिं.स.) : माजी सैनिक, माजी सैनिकांच्या विधवा तसेच युद्ध विधवांच्या पात्र पाल्यांसाठी शैक्षणिक वर्ष 2026-27 करिता पंतप्रधान शिष्यवृत्ती योजना (PMSS) अंतर्गत ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. पात्र विद्यार्थ्यांनी 31 डिसेंबर 2026 पर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, छत्रपती संभाजीनगर यांनी केले आहे.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र विद्यार्थ्यांनी केंद्रीय सैनिक बोर्डाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करावा. अर्जासोबत संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या चेकलिस्टनुसार आवश्यक कागदपत्रे जोडणे बंधनकारक आहे. निर्धारित मुदतीत अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.पंतप्रधान शिष्यवृत्ती योजनेसंदर्भात अधिक माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे 0240-2370313 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधता येईल.पात्र माजी सैनिकांच्या पाल्यांनी या शिष्यवृत्ती योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.
----------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis