
छत्रपती संभाजीनगर, १८ ऑगस्ट (हिं.स.) : संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी २९ ऑगस्ट रोजी होणारे उपोषण १०० टक्के आंतरवाली सराटीतच होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. या पार्श्वभूमीवर मराठा समाजाने सज्ज राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
दरम्यान, मनोज जरांगे पाटील यांच्या प्रकृतीच्या कारणास्तव त्यांचा आजचा मराठवाडा दौरा रद्द करण्यात आल्याची घोषणा करण्यात आली.
त्याचवेळी मुंबईतील मराठा बांधवांनी आझाद मैदान येथे आंदोलन करण्यासाठी परवानगी मिळावी, यासाठी संबंधित प्रशासनाकडे निवेदन दिले आहे.
या पार्श्वभूमीवर २९ ऑगस्टच्या आंदोलनाबाबत मराठा समाजामध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. उपोषणाचे ठिकाण कोणतेही असो, मनोज जरांगे पाटील जो आदेश देतील, तो समाजाला मान्य राहील, अशी भूमिका व्यक्त करण्यात आली आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलनाचा आदेश दिल्यास मोठ्या संख्येने मराठा बांधव मुंबईत दाखल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आगामी काळातील घडामोडींवर समाजाचे लक्ष लागले आहे.
----------------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis