नंदुरबार - भव्य 'प्लेसमेंट ड्राईव्ह'चे आयोजन
नंदुरबार, 18 ऑगस्ट (हिं.स.) जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नंदुरबार आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय.टी.आय.) नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी शुक्रवार, 21 ऑगस्ट 2026
नंदुरबार - भव्य 'प्लेसमेंट ड्राईव्ह'चे आयोजन


नंदुरबार, 18 ऑगस्ट (हिं.स.) जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, नंदुरबार आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय.टी.आय.) नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी शुक्रवार, 21 ऑगस्ट 2026 रोजी भव्य ‘प्लेसमेंट ड्राईव्ह’ (रोजगार मेळावा) आयोजित करण्यात आला आहे. हा मेळावा सकाळी 10 वाजता शासकीय आय.टी.आय., नंदुरबार येथे पार पडेल. या प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये जिल्ह्यातील युवक-युवतींना रोजगाराची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्यासाठी

नामांकित कंपन्या सहभागी होणार आहेत. यामध्ये प्रामुख्याने:

आय.टी.एम. एज्युकेशन ट्रेनिंग प्रा. लि. (नंदुरबार)

आकाश ऑटोमोटिव्ह (धुळे)

अक्षय किया (नंदुरबार)

सहयोग मल्टीस्टेट को-ऑप. बँक लि. (नंदुरबार)

या नामांकित कंपन्यांमधील विविध तांत्रिक व गैर-तांत्रिक अशा 80 हून अधिक रिक्त पदांसाठी

उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील सर्व इच्छुक सुशिक्षित बेरोजगार तरुण-तरुणींनी या संधीचा लाभ घ्यावा, असेही आवाहन

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे प्रभारी सहाय्यक आयुक्त श्री. वाघ यांनी केले आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / मनोहर कांडेकर


 rajesh pande