आमदार सुरेश धस यांच्या प्रयत्नातून मच्छिंद्रनाथ देवस्थानाला रुग्णवाहिका
बीड, 02 ऑगस्ट (हिं.स.)। आ. सुरेश धस यांच्या विधान परिषद सदस्य पदाच्या कालावधीतील स्थानिक विकास निधीतून आष्टी ग्रामीण रुग्णालय येथे अद्ययावत सोयी सुविधा असलेली रुग्णवाहिका इतर दोन रुग्णवाहिका उपलब्ध असल्याने एक रुग्णवाहिका मच्छिंद्रनाथ गड देवस्थान
सुरेश धस


बीड, 02 ऑगस्ट (हिं.स.)।

आ. सुरेश धस यांच्या विधान परिषद सदस्य पदाच्या कालावधीतील स्थानिक विकास निधीतून आष्टी ग्रामीण रुग्णालय येथे अद्ययावत सोयी सुविधा असलेली रुग्णवाहिका इतर दोन रुग्णवाहिका उपलब्ध असल्याने एक रुग्णवाहिका मच्छिंद्रनाथ गड देवस्थान ट्रस्ट सावरगाव या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आली आहे.

श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ देवस्थानचे अध्यक्ष दादासाहेब चितळे यांच्याकडे हे रुग्णवाहिका सुपूर्द करण्यात आली यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. रामदास मोराळे

आष्टीचे नगराध्यक्ष जिया बेग, रंगनाथ धोंडे, उपनगराध्यक्ष शैलेश सहस्त्रबुद्धे, नगरसेवक सुरेश वारंगुळे, ज्ञानदेव राऊत, अक्षय धोंडे, रुग्ण कल्याण समितीचे सदस्य प्रफुल्ल सहस्त्रबुद्धे आणि जालिंदर पोकळे, देवस्थानचे राजू म्हस्के दादा धस हे उपस्थित होते. आमदार सुरेश धस धाराशिव-लातूर- बीड या स्थानिक प्राधिकारी मतदार संघाचे विधान परिषद सदस्य असताना त्यांनी स्थानिक विकास निधीतून ही रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली होती.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande