
छत्रपती संभाजीनगर, 02 ऑगस्ट (हिं.स.)। गेवराई बाजार, ता.बदनापूर इथे केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री दौऱ्यावर आले होते. कपाशीच्या शेताची पाहणी करीत असताना त्यांनी शेतकऱ्यांशी थेट संवादही साधला. महाराष्ट्रात विशेषतः मराठवाड्यात कपाशीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होते आहे याकडे त्यांचे लक्ष वेधले गेले. शेतीतील कपाशीच्या उत्पन्नात वाढ झाली पाहिजे यावर त्यांनी भर दिला.
गिरीराज सिंह, केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री जालना दौऱ्यावर आले असता, त्यांनी बदनापूर तालुक्यातील गेवराई येथील शेतकरी श्री. वैभव देविदास माने यांच्या कपाशीच्या शेतीची पाहणी केली.
कपाशीच्या शेताची पाहणी करीत असताना शेतकऱ्यांशी संवाद साधला कपाशीचे उत्पन्न कसे वाढवण्यात येईल यावर भर देण्यात आला. शासनाकडून शेतकऱ्यांना नेहमी प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा उल्लेख त्यांनी केला
यावेळी कपाशी उत्पादनात वाढ, आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा वापर तसेच शेतकऱ्यांच्या अडचणी व उपाययोजनांबाबत शेतकऱ्यांशी संवाद साधला. तसेच केंद्रीय मंत्री महोदयांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सत्कार करण्यात आला.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis