
छत्रपती संभाजीनगर, 02 ऑगस्ट (हिं.स.)।
महा राजस्व अभियानात लोकप्रतिनिधींना डावलल्याची तक्रार करण्यात आली आहे. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना डावलण्यात येते
अशाही तक्रारी पुढे आल्या आहेत.
छत्रपती संभाजीनगर येथील महा राजस्व अभियानाच्या शासकीय कार्यक्रमात जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांना आमंत्रण देण्यात आले नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात आली. मंत्र्यांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद सभापती सचिन गरड यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार केली. तीन तालुक्यांतील जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्यांना जाणीवपूर्वक डावलल्याचा आरोप करत, वारंवार अशा घटना घडत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. शासकीय कार्यक्रमांमध्ये सर्व लोकप्रतिनिधींना योग्य प्रतिनिधित्व व सन्मान मिळावा, अशी मागणीही त्यांनी केली.
---------------
हिंदुस्थान समाचार / Hanumant Madanrao Chitnis