गोकूळ कारखान्याविरोधात शेतकऱ्यांची पुन्हा आंदोलनाची भूमिका
सोलापूर, 02 ऑगस्ट (हिं.स.)। धोत्री येथील गोकूळ साखर कारखान्याकडील सन २०२३-२४ आणि २०२४-२५ या हंगामातील थकीत ऊस बिले अद्याप मिळालेली नसल्याने शेतकऱ्यांनी पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे. आंदोलनापूर्वी येत्या सोमवारी (दि. ३) शेतकरी जिल्हाधिकाऱ्यांची
sugar mill


सोलापूर, 02 ऑगस्ट (हिं.स.)।

धोत्री येथील गोकूळ साखर कारखान्याकडील सन २०२३-२४ आणि २०२४-२५ या हंगामातील थकीत ऊस बिले अद्याप मिळालेली नसल्याने शेतकऱ्यांनी पुन्हा आंदोलनाचा इशारा दिला आहे. आंदोलनापूर्वी येत्या सोमवारी (दि. ३) शेतकरी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन सादर करणार आहेत.

सोलापूर, धाराशिव आणि लातूर जिल्ह्यातील शेकडो शेतकऱ्यांनी गोकूळ साखर कारखान्याला ऊस पुरवठा केला होता. मात्र, संबंधित हंगामातील ऊस बिले अद्याप अदा करण्यात आलेली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. दरम्यान, कारखान्याची विक्री ओंकार ग्रुपकडे झाल्याची माहिती समोर आल्यानंतर शेतकऱ्यांमध्ये नाराजी वाढली असून, थकीत बिले तातडीने देण्याची मागणी करण्यात येत आहे.

यापूर्वी धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सलग १८ दिवस आंदोलन केले होते. त्यानंतर सन २०२५-२६ हंगामातील थकीत ऊस बिले शेतकऱ्यांना मिळाली. मात्र, २०२३-२४ आणि २०२४-२५ या दोन हंगामांतील थकबाकी अद्यापही न मिळाल्याने शेतकरी पुन्हा आंदोलनाच्या तयारीत आहेत.

शेतकरी प्रतिनिधी सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन थकीत ऊस बिले तातडीने मिळावीत, अशी मागणी करणार असून, समाधानकारक निर्णय न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

---------------

हिंदुस्थान समाचार / यशपाल गायकवाड


 rajesh pande