भाजपाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची परळीतील 'लोकनेता संपर्क कार्यालया'स सदिच्छा भेट
बीड, 02 ऑगस्ट (हिं.स.)। परळी येथील ''लोकनेता संपर्क कार्यालया''स भारतीय जनता पार्टीच्या विविध जिल्ह्यांतील व तालुक्यांतील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी तसेच मान्यवरांनी सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य सतीश (भाऊ) मुंडे आणि भाजप
भाजप पदाधिकारी


बीड, 02 ऑगस्ट (हिं.स.)।

परळी येथील 'लोकनेता संपर्क कार्यालया'स भारतीय जनता पार्टीच्या विविध जिल्ह्यांतील व तालुक्यांतील प्रमुख पदाधिकाऱ्यांनी तसेच मान्यवरांनी सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य सतीश (भाऊ) मुंडे आणि भाजपा तालुकाध्यक्ष राजेश गित्ते यांनी सर्व उपस्थित मान्यवरांचे स्वागत करून त्यांचा यथोचित सत्कार केला.

या भेटीदरम्यान परभणी भाजपा जिल्हाध्यक्ष सुरेश भुमरे, बीड भाजपा जिल्हाध्यक्ष शंकरराव देशमुख, गेवराई भाजपा तालुका अध्यक्ष अशोकराव रसाळ, सचिन दाभाडे, ज्येष्ठ नेते भीमराव सातपुते (दादा), शासकीय कंत्राटदार घोडके साहेब, उद्योजक कमलाकर बिडगर, युवा नेते निलेश सानप, सुभाष बिडगर आणि हांडे दादा यांची प्रमुख उपस्थिती होती.

या प्रसंगी भाजपच्या संघटनात्मक बळकटीकरणासह विविध सामाजिक व राजकीय विषयांवर मान्यवरांमध्ये विस्तृत आणि सकारात्मक चर्चा झाली. परळीतील 'लोकनेता संपर्क कार्यालयात' झालेल्या या स्नेहभेटीमुळे पक्षसंघटनेतील परस्पर समन्वय आणि आपुलकी अधिक दृढ झाल्याचे दिसून आले.

---------------

हिंदुस्थान समाचार / Aparna Chitnis


 rajesh pande