महिलांच्या आत्मनिर्भरतेसाठी शासन कटिबद्ध : मेघना साकोरे-बोर्डीकर
रायगड, 02 ऑगस्ट, (हिं.स.)। महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या वतीने पनवेल विधानसभा मतदारसंघात आयोजित करण्यात आलेल्या ''छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरा''त नागरिकांच्या महसूल विषयक विविध समस्या एकाच छताखाली सोडविण्यात आल्या. या शि
Government-committed-to-women


Government-committed-to-women


Government-committed-to-women


रायगड, 02 ऑगस्ट, (हिं.स.)। महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभागाच्या वतीने पनवेल विधानसभा मतदारसंघात आयोजित करण्यात आलेल्या 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिरा'त नागरिकांच्या महसूल विषयक विविध समस्या एकाच छताखाली सोडविण्यात आल्या. या शिबिरातून राज्यभरातील लाखो नागरिकांना दिलासा मिळत असून, महिलांना आत्मनिर्भर व उद्योजक बनविण्यासाठी शासन विविध योजना प्रभावीपणे राबवत असल्याचे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य, पाणीपुरवठा, ऊर्जा, महिला व बालविकास व सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विरुपाक्ष मंगल कार्यालयात आयोजित या शिबिराचे उद्घाटन राज्यमंत्री बोर्डीकर यांच्या हस्ते झाले. आमदार प्रशांत ठाकूर प्रमुख उपस्थित होते, तर अभिनेते-दिग्दर्शक पुष्कर श्रोत्री यांची विशेष उपस्थिती लाभली. शिबिरात जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, सातबारा उतारा आदी महसूल कागदपत्रांचे तातडीने वितरण करण्यात आले. विविध शासकीय योजनांच्या लाभार्थ्यांनाही लाभांचे वाटप करण्यात आले.

राज्यमंत्री बोर्डीकर म्हणाल्या की, महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असून प्रत्येक महिला लखपती होण्याचे उद्दिष्ट आहे. तसेच शेतकऱ्यांना हमीभाव वाढविणे आणि तरुणांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याचे सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यात समाधान शिबिरांद्वारे १० लाख नागरिकांना लाभ देण्याचे उद्दिष्ट असून, त्यापैकी रायगड जिल्ह्यातील सव्वादोन लाखांहून अधिक नागरिकांनी या शिबिरांचा लाभ घेतल्याची माहिती त्यांनी दिली.

आमदार प्रशांत ठाकूर यांनी लोकप्रतिनिधी हे शासन आणि नागरिक यांच्यातील दुवा असल्याचे सांगत, सरकारी योजनांचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी वर्षभर सातत्याने कार्य सुरू असल्याचे स्पष्ट केले. कार्यक्रमास जिल्हाधिकारी किशन जावळे, उपविभागीय अधिकारी पवन चांडक, तहसीलदार मिनल भामरे यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी, अधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---------------

हिंदुस्थान समाचार / संदेश साळुंके (रायगड)


 rajesh pande